TRENDING:

Free Food Pune : वाढदिवसाला हवी टेस्टी ट्रीट? पुण्यात 'या' ठिकाणी ग्राहकांना मिळते मोफत बिर्याणी

Last Updated:

Rajdhani Darbar Biryani House : पुण्यात असे एक ठिकाण आहे. जिथे तुम्हाला तुमच्या वाढदिवसादिवळी फ्रीमध्ये बिर्याणी खाण्यास मिळते. चला तर जाणून घ्या नेमके हे ठिकाण कुठे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील बिर्याणीप्रेमींसाठी एक भन्नाट ऑफर आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी जर तुम्हाला खास सरप्राईज हवे असेल तर आता त्यासाठी कुठे जायचे हे ठरवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. पुण्यातील राजधानी दरबार बिर्याणी हाऊस या लोकप्रिय हॉटेलमध्ये ग्राहकांना वाढदिवशी मोफत बिर्याणी मिळते. ही ऑफर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत असून अनेक तरुण-तरुणी आणि कुटुंबीय या संधीचा फायदा घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा फक्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच लागू आहे.
News18
News18
advertisement

राजधानी दरबार बिर्याणी हाऊसची शाखा किवळे-रावेत परिसरात, मुकाई चौकाजवळ आहे. या भागात राहणारे किंवा जवळपासचे लोक वाढदिवशी मोफत बिर्याणी मिळवण्यासाठी हॉटेलला भेट देऊ शकतात. पुण्यातील बिर्याणीप्रेमींना हे ठिकाण आधीपासूनच आवडते. पण, वाढदिवशी मिळणाऱ्या या खास ट्रीटमुळे त्याचे आकर्षण अधिक वाढले आहे.

वाढदिवस साजरा करण्याचा आनंद दुपटीने वाढवणारी ही ऑफर केवळ एक जेवण न राहता एक आठवणीतील अनुभव ठरते. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय किंवा सहकारी यांच्यासह वाढदिवस साजरा करण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय ठरत आहे. बिर्याणीची चव, सुगंध आणि राजेशाही पद्धतीची सर्व्हिस यामुळे ग्राहक नेहमीच खूश राहतात.

advertisement

परंतूया ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू असू शकतात. त्यामुळे आपण हॉटेलला भेट देण्यापूर्वी सोशल मीडियावर राजधानी दरबार बिर्याणी हाऊसची अधिकृत माहिती आणि अटी तपासणे महत्त्वाचे आहे. त्यांचे फेसबुक किंवा इन्स्टाग्राम पेजवर नियमित अपडेट्स दिले जातात.

म्हणून, जर तुमचा वाढदिवस जवळ आला असेल आणि तुम्हाला तो अधिक खास करायचा असेल, तर एकदा मुकाई चौक रावेतमधील राजधानी दरबार बिर्याणी हाऊसला भेट द्या. मोफत बिर्याणीचा आनंद घेतल्यावर वाढदिवसाची आठवण आणखी गोड होईल यात शंका नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Free Food Pune : वाढदिवसाला हवी टेस्टी ट्रीट? पुण्यात 'या' ठिकाणी ग्राहकांना मिळते मोफत बिर्याणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल