परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांकडून होणार्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी विभागीय, जिल्हा आणि विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली गेली आहे. अनेकदा परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी वर्गाच्या बाहेरून अनेक लोकं कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ आपण परीक्षेच्या काळात पाहिले असतील, या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने आता भरारी पथकाचीच नियुक्ती केली आहे. भरारी पथक विद्यार्थ्यांमध्ये आपआपसात होणाऱ्या कॉपी पुरवण्याच्या प्रकरणाला आळा घालणार आहे.
advertisement
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर राज्य परीक्षा मंडळ 14 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. राज्य परीक्षा मंडळ अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी याबाबत आदेश जारी केले. परिक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर प्रमुखांना सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अनिवार्य केले आहे. या माध्यमातून परिक्षेच्या काळात केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी लक्ष दिले जाणार आहे. फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी ज्युनियर कॉलेजसह शाळांमध्येही तयारी जोरदार सुरू झाली आहे. परिक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रावर तयारी सुरू झाली आहे. तर, 12 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना हॉलतिकिट देण्याचे काम सुरू झाले आहे.
