दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी 'अपार आयडी'ची ही सक्ती विद्यार्थ्यांना केली जाते. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिलॉकर (Digilocker) च्या माध्यमातून मार्कशीट उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडे डिजिटल पद्धतीने मार्कशीट उपलब्ध होईल. डिजिटल प्रणालीमुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान इतरत्र काम अधिकच सुलभ होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड सहज उपलब्ध होतील.
advertisement
'अपार आयडी' आणि डिजिटल गुणपत्रिकांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढे भविष्यामध्ये अनेक महत्त्वाचे फायदे होणार आहेत. सर्व शैक्षणिक मार्कशीट्सचा विद्यार्थ्यांकडे आयुष्यभरासाठी डिजिटल रेकॉर्ड तयार होईल, जो विद्यार्थ्यांना सहजपणे एकत्रित उपलब्ध होईल. यामुळे विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी भौतिक कागदपत्रांची गरज भासणार नाही. या प्रणालीमुळे शासकीय शिष्यवृत्ती आणि योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. तसेच, शैक्षणिक रेकॉर्ड्स कोठूनही उपलब्ध राहतील. हे एक केंद्रीकृत आणि सुरक्षित व्यासपीठ असेल, ज्यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज गमावण्याचा धोका नाहीसा होईल.
शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसला त्यांच्याकडील विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त 'अपार आयडी' नोंदणी कन्फर्म करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, www.mahahsscboard.in सादर करावी लागेल. सर्व मान्यताप्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेबद्दल माहिती दिली जावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाच्या कार्यालयात सादर करावा, असे या सूचनेत नमूद केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी 10वी आणि 12 वीच्या परीक्षांमध्ये सहभागी होणार्या विद्यार्थ्यांसाठी 'आपार आयडी' मध्ये लॉग ईन करणं अनिवार्य केले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदींची कार्यक्षमता आणि उपलब्धता वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आहे. यामुळे विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल.
