मिळालेल्या माहितीनुसार, फारुक तांबोळी हा शाळेतून सुटल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास सायकलवरून आपल्या घराकडे निघाला होता. प्रेम लोक पार्क परिसरातून आकुर्डीहून चिंचवडगावच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या एका अवजड ट्रकने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, फारुक थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचे दृश्य परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. एका बेजबाबदार चालकामुळे फारुकचा जीव गेला. भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे रस्त्यावरील नागरिक सुन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. सध्या चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील अवजड वाहनांच्या वेगावर आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
