पुणे : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच आपण सजावटीसाठी प्लास्टिक किंवा थर्माकॉलचा वापर करतो. मात्र, यावर्षी आता बाप्पाच्या सजावटीला पारंपरिकतेचा साज देत सुंदर असे लाकडा पासून बनवलेले मखर बाजारात पाहायला मिळत आहे. पुण्यातील रविवार पेठ येथील साईनाथ फर्निचर या दुकानात अनेक प्रकारचे मखर पाहायला मिळत आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
पुण्यातील रविवार पेठ या ठिकाणी साईनाथ फर्निचर म्हणून दुकान आहे. याबाबत व्यावसायिक राजेश बढाई यांनी सांगितले की, मागील 25 ते 30 वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत. थर्माकॉलला चांगला पर्याय म्हणून झाडाच्या लाकडापासून म्हणजेच एमडीएफ लाकूड असून हे मखर बनवले जाते. तुम्ही ते अतिशय सहजतेने फोल्ड करुनही ठेऊ शकता.
खिल्लार गायींच्या गोमुत्रातून लाखोंची उलाढाल, सोलापुरातील भाऊ-बहिणीची कमाल!
पर्यावरण पूरक असे हे मखर सर्वांना परवडणारे आहे. ते जवळपास 5 ते 6 वर्षे टिकते. याची किंमत 400 रुपयांपासून सुरू होते. त्याच्या वेगवेगळ्या साईझही याठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये शंकराची पिंड, स्वामी, ॐ, राजवाडा, मोदक, मोर पॅटर्न इथे पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त इथे पांगुळ गाडा, लाकडी खेळणीही बनवली जात असल्याची माहिती व्यावसायिक राजेश बढाई यांनी दिली.
एक गाव एक वाण, एकरी 60 क्विंटल उत्पादन, शेतकरी मालामाल, हे आहे राज्यातील मक्याचे गाव, VIDEO
या मखरची किंमत ही सर्वांना परवडेल म्हणजेच अगदी 400 रुपयांपासून पुढे, अशी आहे. यामध्ये 25 पेक्षा जास्त व्हरायटी इथे आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करत असाल तर नक्कीच याचा वापर करा.