नागरी सनदी सेवेत २०१५ ते २०२३ च्या काळात तब्बल ४४ उमेदवारांनी अपंगत्वाचं सर्टिफिकेट जोडून प्रवेश मिळवला आहे. याची यादीही आता समोर आली आहे. सनदी सेवेत अशा पद्धतीने सर्टिफिकेटचा वापर करून जर उमेदवार प्रवेश करत असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे काय? केंद्र सरकार या सर्व संशयास्पद नावांची चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे या 44 जणांच्या संशयास्पद दिव्यांग सर्टिफिकेटचा आधार घेऊन अधिकारी बनलेल्यांच्या यादीत अनेक माजी शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे. तसंच ४४ जणांनी PwBD या स्पेशल दिव्यांग कँटगरीतून नागरी सेवेत क्लास वनची उच्चपदस्थ नोकरी पटकावली आहे.
पूजा खेडकर यांचं तीन वर्षात वय एक वर्षाने वाढलं
पूजा खेडकर यांनी 2020 साली स्वत:चं वय 30 वर्ष दाखवलं आहे तर 2023 मध्ये त्यांनी स्वत:चं वय 31 वर्ष सांगितलं आहे. म्हणजेच तीन वर्षांमध्ये पूजा खेडकर यांचं वय फक्त 1 वर्षाने वाढलं आहे. पूजा खेडकर यांनी 2020 साली डॉक्टर पूजा दिलीपराव नावाने आवेदन केलं, जिकडे त्यांनी स्वत:चं वय 30 वर्ष दाखवलं. तर 2023 मध्ये त्यांचं नाव बदलून मिस पूजा मनोरमा दिलीप खेडकर झालं आणि त्यांचं वय 31 वर्ष दाखवण्यात आलं आहे.