पुणे : ओडिशा हे वेगवेगळ्या हस्तकला आणि हॅंडीक्राफ्टसाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील जे. एम रोड परिसरात असणारे उत्कलिका हँडलूम हे ओडिशा सरकारकडून चालवले जाते. इथे ओडिशा हँडिक्राफ्ट आणि दगडाच्या मूर्ती पाहायला मिळतात. हे ओडिशा सरकारने 1994 मध्ये स्थापन केले आहे. इथे आल्यावर ओडिशामधील अप्रतिम असे स्थापत्य कलेचे दर्शन घडते. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
1994 साली या उत्कालिका हॅन्डलूमची स्थापना करण्यात आली आहे, जेणेकरून या कला लोकांना माहिती होतील. यामध्ये इकत हँडलूम, हँडीक्राफ्ट वस्तू, दगडाच्या मूर्ती, वेगवेगळे कलाप्रकार इथे पाहायला मिळत आहेत. 50 रुपयांपासून ते अगदी एक-दीड लाखांपर्यंतच्या वस्तू याठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता.
मुंबईच्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी, प्रवाशांची पहिली प्रतिक्रिया काय?
हे उत्कलिका हँडलूम एफ. सी रोड येथील हॉटेल रुपाली शेजारी आहे. इथे वेगवेगळे हँडीक्राफ्ट बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. 8 प्रकारच्या कला इथे पाहायला मिळतात. तसेच साडी, ड्रेस मटेरिअल इथे बघायला मिळते, अशी माहिती मॅनेजर विश्वविकास आचार्य यांनी दिली लोकल18 शी बोलताना दिली.