पुणे : कॅलिग्राफी कला ही व्हिज्युअल आर्टचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये कुशल कलाकार सुंदर लेखन तयार करण्यासाठी विशेष साधने वापरतात. आणि त्याच्या माध्यमातून एक सुंदर अशी कलाकृती ते तयार करत असतात. पुण्यातील कलाकार कट्टा येथे असणारे शबीर शेख हे गेली 18 वर्ष झालं ही कला जोपासत आहेत. कॅलिग्राफीच्या माध्यमातून कस्टमाईज गिफ्ट कसं बनवलं जात याबद्दलच त्यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कस्टमाईज गिफ्ट कसं बनवलं जात?
कॅलिग्राफी व्हिज्युअल आर्टचा एक प्रकार ज्यामध्ये अक्षरे आणि शब्दांची कुशल पद्धतीने मांडणी केली जाते. अनेक शतकांपासून संस्कृतींमध्ये प्रचलित असणारी ही कला आहे. कॅलिग्राफीमध्ये पारंगत असलेले कलाकार ही नावे, डिझाईन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्रीचा वापर करत असतात. पेन, कटर, मेटल यांसारखी विशेष साधने वापरतात आणि लिखित शब्दाला कलाकृती बनवतात.
'त्या' मुलांसाठी आदित्य बनला मावळा, शिवकालीन युद्ध कलेचे देतोय मोफत धडे, Video
मेटल कटिंगच काम आम्ही करतो. कॅलिग्राफी हे काम तसं पुण्यामध्ये फार कमी ठिकाणी पाहिला मिळते. सर्व प्रथम मेटल वर कॅलिग्राफी करून मेटलला कट केले जाते. याला पॉलिश करावं लागतं. तशी ही कला फार मेहनतीची आहे. गेली 18 वर्ष झालं मी ही कला जोपासत आहे. तसंच या कलेचं वैशिष्ट्य असं की पितळ असल्यामुळे खराब आणि तुडण्याची शक्यता नसते. कायम स्वरूपी तुमच्याकडे राहते. 40 रुपये दरामध्ये हे करुन दिलं जात. यामध्ये पर्सनलाईझ नाव, गणपती, रामाची मूर्ती तयार करून दिली जाते तसंच हे गिफ्ट म्हणून देखील देऊ शकतो, अशी माहिती कॅलिग्राफी आर्टिस्ट शबीर शेख यांनी दिली आहे.
शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचा संग्रह, वाघनखांचे हे प्रकार पाहिलेत का?
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावे, तसंच मूर्ती ही तयार केल्या जातात. आणि दिसायला देखील अतिशय उत्कृष्ट असं हे कॅलिग्राफी कला आहे आणि ही फार पूर्वीपार चालत आलेली कला परंतु आता फारस कोणी करताना पाहिला मिळत नाही. परंतु शबीर शेख यांनी ती जतन केली आहे. त्यामुळे अनोख्या आणि वेगळ्या प्रकारचे गिफ्ट दायचे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.





