TRENDING:

तक्रार येताच पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं; संतोषला ताब्यात घेताच पुण्यातील 6 पोलीस ठाण्यातील त्या 9 गुन्ह्यांचा लागला छडा

Last Updated:

संत तुकारामनगर पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी: शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. संत तुकारामनगर पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सराईत वाहन चोरट्याला बेड्या (प्रतिकात्मक फोटो)
सराईत वाहन चोरट्याला बेड्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

सीसीटीव्ही फुटेजने लावला छडा

संतोष शिवराम घारे (वय ४४, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संतोष घारे याला कामशेत येथून ताब्यात घेतले.

advertisement

आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे सहकारनगर, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी, सांगवी, तळेगाव एमआयडीसी आणि संत तुकारामनगर अशा अनेक पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड झाले आहेत.

जप्त केलेल्या ११ दुचाकींपैकी ९ दुचाकींच्या मालकांचा शोध लागला असून, उर्वरित दोन दुचाकींच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

advertisement

पोलिसांचे आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि सह-आयुक्त शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत, त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईमुळे मावळ आणि पिंपरी परिसरातील वाहन चोरांच्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
तक्रार येताच पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं; संतोषला ताब्यात घेताच पुण्यातील 6 पोलीस ठाण्यातील त्या 9 गुन्ह्यांचा लागला छडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल