शरद मोहोळच्या हत्येतील आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी
गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पुणे न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमृत बिराजदार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या आरोपींना हजर केले होते. ॲड रोहिणी लांडगे (रामदास मारणे आरोपी वकील किंवा विधी प्राधिकरण वकील) आणि ॲड डी. एस. भोईटे (विठ्ठल शेलार आरोपी वकील) ॲड गोपाळ ओसवाल (फिर्यादी वकील) तर सरकारी वकील ॲड नीलिमा इथापे - यादव यांनी युक्तिवाद केला. एक महिन्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे उर्फ वाघ्या यांच्यात बैठक झाली होती. विठ्ठल शेलारकडून वापर झालेल्या गाडीचा तपास करायचा आहे. या आधी दोन गाड्या जप्त (इनोव्हा आणि क्रेटा जप्त) करण्यात आल्या आहेत.
advertisement
कोण आहे विठ्ठल शेलार?
शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून, 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
वाचा - सोशल मीडियावरील Scam पासून वाचायचं असेल तर 'या' ट्रिक्स येतील कामी
हत्येमागचं नवीन कारण समोर
मृत मोहोळ शरद आणि आरोपी विठ्ठल शेलार यांच्या दोन टोळ्या सहा महिन्यांपूर्वी राधा चौकात आमनेसामने आल्या होत्या. तेव्हा मोहोळ टोळीच्या हल्ल्यात विठ्ठल शेलार थोडक्यात वाचला होता. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची हत्या झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे.
