मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. शहरात दुपारी उष्णता आणि आर्द्रता जाणवेल, परंतु संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, पण पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
40 ते 45 फूट उंच, परंपरेने जातात डोंगरावर, जोतिबा यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व काय? Video
advertisement
पुण्यात कमाल तापमान 38 अंश आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीत दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर संध्याकाळी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी येथे तापमान 39 अंश सेल्सिअस राहील, तर जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा देत नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी प्यावे आणि हलके कपडे परिधान करावेत, असे आवाहन आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सावध राहण्यास सांगितले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे.





