पुणे: मार्च महिन्याच्या सुरवातीला 2 दिवस राज्यातील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना 4 मार्चसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत तुरळक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
राज्यात 4 मार्चला सर्वत्र कोरडे हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मुख्यत: निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहील. मुंबईतील तापमानात काहीशी घट झाल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुढील काही दिवसांत मुंबईतील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
महायुती सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफी करेल का? शेतकऱ्यांनी मनातलं बोलून दाखवलं
पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 4 मार्चला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत पुण्यातील तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 मार्चला निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तेथील तापमानात देखील पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो.
नाशिकमधील तापमानात देखील पुढील काही दिवसांत बहुतांश वाढ होणार आहे. नाशिकमध्ये 4 मार्चला मुख्यतः निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्यानं तेथील नागरिकांना काळजी घेणे आवश्यक आहे.
Ration Card e-KYC: रेशनसाठी आता घरबसल्या करा ई-केवायसी, आपल्या मोबाईलवरून फक्त हे करायचं!
नागपूरमध्ये 4 मार्चला अंशतः ढगाळ वातावरण असून तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमधील तापमानात पुढील काही दिवसांत काहीशी घट होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात मार्च महिन्यात 2 दिवस घट बघायला मिळाली. आता त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होऊन सर्वाधिक तापमान 38 ते 39 अंश पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.





