मुंबईत 3 एप्रिल रोजी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शहरात आर्द्रता आणि उष्णतेसह दुपारनंतर हलका पाऊस पडू शकतो. पुण्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस असेल तर दुपारच्या वेळी गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. नागपुरात हवामान तीव्र राहील, जिथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. तर अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
Share Market : सगळं चांगलं चाललं होतं, त्या एका निर्णयामुळे शेअर मार्केटमध्ये पडझड
नाशिकमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल 36 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तापमान अनुक्रमे 35 आणि 37 अंश सेल्सिअस कमाल आणि 21 आणि 23 अंश सेल्सिअस किमान असेल. सातारा आणि जालना यांसारख्या भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बीड जिल्ह्याला आज ऑरेंज तर 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या कालावधीत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील आहे.
हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता आणि स्थानिक अस्थिरतेमुळे हे बदल होत आहेत. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना गारपिटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






