कोकणात, विशेषतः मुंबई आणि ठाण्यात, सकाळी उष्ण आणि दमट हवामान असेल, तर संध्याकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे आणि नाशिकसारख्या मध्य महाराष्ट्रातील शहरांमध्ये तापमान 35 ते 39 अंशांदरम्यान राहील, परंतु संध्याकाळी वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना येथे उष्णता तीव्र असेल, पण काही ठिकाणी रात्री हलका पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो.
advertisement
Chicken: चिकन खाल्ल्याने खरंच होतो का कॅन्सर? डॉक्टरांचा मोठा खुलासा
विदर्भात नागपूर, अमरावती येथे तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचेल आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होऊ शकते. हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की, नैऋत्य मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात मे महिन्यात होत असल्याने, काही भागांत आंबेसरी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांना दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर पडणे टाळण्याचा, पुरेसं पाणी पिण्याचा आणि हलके कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील बदलांमुळे सर्वांनी सतर्क राहावे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.





