TRENDING:

"इथे फक्त...", फायरिंग करताना हल्लेखोर काय म्हणाले? आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट!

Last Updated:

Ayush Komkar Case: पुण्यात आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्या आहे. हल्लेखोर गोळ्या झाडताना काय म्हणाले, याची माहिती आता समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्या. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या. यातील ९ नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात आढळल्या आहेत. हल्लेखोरांनी बेसमेंटमध्ये दबा धरून आयुषची हत्या केली. पण आयुषची हत्या करताना यश आणि अमन काय म्हणाले? याबाबतचा तपशील आता समोर आला आहे.
News18
News18
advertisement

आयुष कोमकर खून प्रकरणी समर्थनगर पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे दोघांना अटक केली आहे. आरोपी यश आणि अमित यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना कोर्टाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

advertisement

या प्रकरणी पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवले असता त्यांनी हल्लेखोर अमन पठाण आणि यश पाटील यांना ओळखले. दोघेही आंदेकर टोळीसाठी काम करतात, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याबाबत अधिक खोलात जाऊन तपास केला असता, अमन आणि यश आयुषवर गोळ्या झाडताना काय म्हणाले? याची देखील माहिती समोर आली आहे.

advertisement

आरोपी अमन आणि यश यांनी आयुषवर गोळीबार करताना ‘इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच’ असं म्हणत दहशत माजवल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने आरोपींवर फौजदारी कायद्यातील दुरुस्तीच्या कलम सातनुसार कलमवाढ करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांना १२ पुंगळ्या आणि एक अर्धवट पुंगळी सापडली आहे. मृतदेहात एकूण नऊ गोळ्या आढळल्या आहेत. त्यावरून आरोपींनी आयुषला किती क्रूरपणे संपवलं, याचा अंदाज लागू शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
"इथे फक्त...", फायरिंग करताना हल्लेखोर काय म्हणाले? आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल