TRENDING:

wari 2024 : वारी का काढली जाते? कोण आहेत वारीचे जनक? असा आहे वारीचा भव्य-दिव्य इतिहास

Last Updated:

Pandharpur Wari 2024 : या पालखी सोहळ्याची सुरूवात श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तपोनिधी श्री नारायण महाराज होय. या पालखी सोहळ्याची सुरूवात इ. स. १६८५ मध्ये झाली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या कानकोपऱ्यातून लाखो वारकरी हे आळंदीहुन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत तर देहू येथून तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरीला जात असतात. तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदा हे 339 वे वर्ष आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 वे वर्ष आहे. पण या वारीचा इतिहास नेमका आहे, वारी का काढली जाते, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

advertisement

या पालखी सोहळ्याची सुरूवात श्री. संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तपोनिधी श्री. नारायण महाराज यांनी 1685 मध्ये केली, अशी माहिती विठोबा संस्थान सेवक रविंद्र पाद्य यांनी दिली आहे. श्री नारायण महाराजांनी ज्येष्ठ वद्य अष्टमीला देहूगावातून निघणाऱ्या दिंडीवाल्यांच्या खांद्यावर पालखी दिली. या पालखीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून दिंडी आळंदीला गेली. तेथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि वारकरी ज्ञानोबा तुकाराम नामाचे भजन करीत पंढरपूरला नेली. पुढे ही प्रथा पडली व आजही ही प्रथा तशीच सुरू आहे. दिवसेंदिवस पालखी सोबत समाज वाढत गेला.या नंतर ही दिंड्या वेगवेगळ्या झाल्या आहेत.

advertisement

Wari 2024: देहू गावात जिथं संत तुकोबा राहिले, ती वास्तू आज कशी आहे?

View More

श्री नारायण महाराजांनी सुरुवातीला काही काळ परंपरेप्रमाणे पंढरपूर वारी सुरू ठेवली. ते कल्पक आणि उपक्रमशील असल्याने त्यांनी वारकरी संप्रदायात पालखीची नवीन प्रथा सुरू केली. मध्ययुगात पालखीत बसणे हा सर्वोच्च मान होता. तोच मान संतांना मिळावा, ही कल्पना करून वारकरी संप्रदायात पालखी सोहळा सुरू केला. सोहळ्यासोबतच किमान 5 ते 6 लाख भाविक पायी चालत वारी करतात. या सर्व भाविकांना सोयी सुविधा पुरविताना प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. पालखी सोहळा केवळ श्री संत नारायण महाराजांमुळे सुरू झाल्याने वारकरी संप्रदाय एकसंघ बांधलेला पहायला मिळत आहे. याचे श्रेय श्री नारायण महाराजांना जाते.

advertisement

ओढ विठुरायाच्या भेटीची! 315 वर्षांची परंपरा, 60-65 दिवसांचा प्रवास, संत मुक्ताईची पालखी जालन्याहून पंढरपूरकडे रवाना

श्री संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा यांच्यापासून पंढरीची वारी (Pandharpur Wari 2024) त्यांच्या घरात होती. परंतु पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरला नेण्याची परंपरा आणि त्याची खरी सुरुवात ही तपोनिधी नारायण महाराजांनी केली आहे. आज

advertisement

हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होतात आणि वर्षभर ही ऊर्जा मिळत राहते. संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांची भावंड, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, चोखामेळा, गोरा कुंभार या सर्व संतानी भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. पंढरपूरचे तसेच भागवत धर्म आणि भगवद्गीतेचे महत्व लोकांना पटावं म्हणून ही वारी सुरू झाली आहे. सगळ्यांनी सुखी रहा, सांभाळून रहा आणि एकमेकांना सहकार्य करा, हा संदेश वारीमध्ये दिला जातो.

प्रत्येक संत हे आपल्या ठिकाणाहुन निघून पंढरपूर या ठिकाणी एकत्र येत भजन, कीर्तन, प्रवचन करतात. तहान भूक हरपून सगळे विठ्ठलाच्या भक्तीरसात एकरूप होतात. त्यामुळेच वारी जीवनात एकदा का होईना, पण आवश्य करावी.

मराठी बातम्या/पुणे/
wari 2024 : वारी का काढली जाते? कोण आहेत वारीचे जनक? असा आहे वारीचा भव्य-दिव्य इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल