पुणे : मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे. बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणं आहेत. गुदद्वाराच्या आतील व बाहेरील भागातील सुजलेल्या रक्त वाहिन्यांना मूळव्याध म्हणतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता 18 ते 25 या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागला आहे.
advertisement
हा आजार कोणालाही सहजपणे होतो. मात्र, याची नेमकी कारणे काय आहेत, त्यावर काय उपाय करावेत, याबाबत लोकल18 च्या टीमने पुण्यातील स्त्रीरोग आणि बालरोग तज्ञ चिकित्सक डॉ. सचिन पवार यांच्याशी संवाद साधला. डॉ. सचिन पवार हे मागील 10 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकल18 सोबत बोलताना त्यांनी याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
मूळव्याध होण्यामागील कारणे काय -
पोट साफ न होणे, अति प्रमाणात तिखट खाणे, वेळेवर न झोपणे, जेवण कमी करणे तसेच पाणी कमी प्रमाणात पिणे, व्यायामाचा अभाव, चालणं, फिरणं, नसणे, त्याचप्रमाणे महिलांना प्रस्तुती दरम्यान आतद्यावर प्रेशर येऊन गुदद्वारावर ताण येऊन प्रस्तुतीनंतर देखील मूळव्याध होण्याची शक्यता असते.
मूळव्याधाची लक्षणे काय आहेत
शौचाच्या जागेस दुखणे, रक्त येणे, खाज येणे, तसच आत मध्ये गुदद्वारात टोचल्यासारखे होते, अशी काही लक्षणे ही मूळव्याध झाल्यानंतर आढळून येतात. काही प्रमाणात एनीमिया झाल्यामुळे भूक मंदावते. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात कॉम्प्लिकेशन दिसून येतात.
प्रकार कोणते?
दोन प्रकार आहेत एक इंटरनल पाईल्स आणि दुसरं एक्सटेर्नल पाईल्स. इंटरनल पाईल्समध्ये मूळव्याध गुदद्वाराच्या आतमध्ये रक्त वाहिन्यांना सूज येणे व रक्त जाणे ही लक्षण दिसून येतात. तर इंटरनल पाईल्समध्ये गुदद्वारा च्या बाहेरील भागात सूज येते व वेदना होतात.
अमेरिकेत शिक्षण, परदेशातील लाखो रुपयांच्या नोकरीला नाकारलं, महिलेनं घेतला हा मोठा निर्णय
तसेच यामध्ये ग्रेडनुसार चार प्रकार पाईल्स दिसून येतात. फर्स्ट ग्रेड पाईल्स वेदना होतात. तर जवळच्या डॉक्टराकडून उपचार घ्यावे. याने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. ग्रेड टू पाईल्समध्ये वेदना होऊन रक्तदेखील येत. त्याला औषधीसोबत डायट, लाईफस्टाईल मध्ये बदल करावा लागतो. थर्ड पाईल्स ग्रेडमध्ये रक्त येणे वेदना होणे किंवा गाठी बाहेर येणे, असे होते. यामध्ये सर्जरी करावी लागते किंवा सर्जनला दाखवावे. फोर ग्रेड पाईल्समध्ये रक्त येणे वेदना होणे तसच पाईल्स बाहेर आले की ते आत जात नाहीत त्यामुळे कॉम्प्लिकेशन वाढतात. तेव्हा सर्जरी करावी लागू शकते.
होऊ नये यासाठी काय करावे -
वेळेवर जेवण करावे, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, वेळेवर झोप घेतली पाहिजे. तसेच आहारात फायबर असणारे पदार्थ खावे. पोट साफ होईल, असा आहार असावा, असेही डॉ. सचिन पवार सांगितले.