Pune Crime : पुणे हादरलं! जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार; मग दागिन्यांची चोरी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपी सुमेश गेंदे हा पुण्यात कामाला असताना त्याने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, त्याने महिलेला दमदाटी करून दागिनेही हडपले.
पुणे : पुणे शहरात एका महिलेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सुमेश शंकर गेंदे (वय ३०, रा. परभणी) याला अटक केली असून, त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमानवी कृत्याचा धक्कादायक प्रकार: मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडला. आरोपी सुमेश गेंदे हा पुण्यात कामाला असताना त्याने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, त्याने महिलेला दमदाटी करून तिच्या कानातील सोन्याचे दागिने आणि लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही बळजबरीने काढून घेतले.
advertisement
बदला घेण्यासाठी भावालाही सामील केलं: या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, आरोपी सुमेशचे पीडित महिलेच्या पतीसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा सूड उगवण्यासाठी त्याने आपल्या भावाला, नीलेश गेंदे याला देखील बोलावून घेतले आणि त्याला पीडित महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. पतीसोबतच्या वादाचा बदला घेण्यासाठी एका महिलेचा अशा प्रकारे छळ केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलिसांनी तातडीने हालचाली करत मुख्य आरोपी सुमेश गेंदेला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा भाऊ नीलेश गेंदे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे हादरलं! जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार; मग दागिन्यांची चोरी







