पुणे : बैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे. स्पेनमधील बैल पळवण्याच्या स्पर्धा ही खूप जुनी समजली जाते. आपल्या देशातही शेतीचा हंगाम संपल्यानंतर पशुपालक शेतकरी वेगवेगळ्या ग्रामदेवतांच्या यात्रा, जत्रा, उरूस यामधून आपले कौशल्य, जसे की वजन उचलणे, तलवार फिरवणे, कुस्त्या अशा प्रकारच्या कौशल्याचे प्रदर्शन करतात. या माध्यमातून मनोरंजन करतात व आनंद लुटतात. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतसुद्धा पारंपरिक खेळ म्हणून सादर केला जातो.
advertisement
मात्र, बैलगाडा शर्यतीमधील बैल नेमका कसा खरेदी केला जातो, याबाबत अनेकांना माहिती नसेल. याच बाबत आपण जाणून घेणार आहोत. लोकल18 च्या टीमने याबाबत आढावा घेतला. तर मग ही प्रक्रिया नेमकी कशी असते, हे जाणून घेऊयात.
कौतुकास्पद! 58 वर्षांची महिला झाली बारावी पास, पुण्यातल्या मावळमधील प्रेरणादायी कहाणी
बैलगाडा शर्यतीचे गावोगावी आयोजन केले जाते. आयोजनामागे ग्रामीण अर्थकारणाचाही एक महत्त्वाचा पैलू आहे. ज्या गावात शर्यत आयोजित केली जाते, त्या गावाच्या अर्थकारणावर याचा मोठा प्रभाव पडतो. या सगळ्याचं चक्र बैलाभवती फिरतं. हा बैलं खरेदी करतांना महत्वाचे म्हणजेच त्याची जात पहिली जाते. विशेषतः खिलारी बैलांना जास्त मागणी असते.
याविषयी बोलताना गाडा मालक स्वप्नील यांनी सांगितले की, बैल खरेदी करताना हा बैल आपल्या बैलासोबत पळेल का, याची शहानिशा सर्वात आधी केली जाते. त्याची धावण्याची क्षमता किती आहे ते आधी तपासले जाते. तसेच त्याचे हात, पाय, त्याचे डोळे त्याची नजर हे सर्व तपासले जाते. जर लहान बैलं विकत घ्यायचं ठरले तर हा शर्यतीत धावू शकेल का, त्याची क्षमता किती आहे हे सर्व तपासून पाहिले जातं. लहान बैल कमीत कमी किमतीत घेऊन त्यांच्या संगोपणावर खर्च करून त्यांना शर्यतीसाठी तयार केले जाते, असं त्यांनी म्हटले आहे.
महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे एकदम भारी, कमी पैशात मिळणार तब्बल इतकं व्याज
बैल खरेदी करताना तो खिलार किंवा बेरड जातीतला असावा. या बैलांचे गुणधर्म म्हणा किंवा शारीरिक वैशिष्ट्य असं की, ज्याप्रमाणे घोडा धावतो, त्याप्रमाणे खिलार जातीच्या बैलांची धावण्याची क्षमता असून हे वैद्यकीय अहवालानुसार सिद्ध झाले आहे. बैलाचा बांधा, त्याची जात, त्याचा रंग, त्याचा रुबाबदारपणा, त्याचे शिंग हे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जातात. त्यांना जंताची औषधे देखील दिली जातात.
अशाप्रकारे गावागावात, जिल्हा जिल्ह्यात बैलगाडा शर्यत हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. बैलगाडा शर्यत ही अनेक गाडामालकांसाठी एक आगळीवेगळी मेजवानी असते. तसेच पंचक्रोशीत मान मिळवून देणारा बैल हा त्यांच्या दृष्टीने कुटुंबातील सदस्या इतकाच महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले.