महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे एकदम भारी, कमी पैशात मिळणार तब्बल इतकं व्याज
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, यासाठी पहिली अट ही आहे की, या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही भारताची रहिवासी असायला हवी. यासाठी वयाची कुठलीही अट नाही.
उद्धव कृष्णा, प्रतिनिधी
पाटणा : महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहेत. यातच आता पोस्ट ऑफिसची एक योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना-2023 ही भारत सरकारची भारतीय महिलांसाठी एक लहान बचत योजना आहे. भारतीय महिलांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे हा योजने उद्देश आहे.
पाटण्यातील लोहिया नगर पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर विपिन प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, यासाठी पहिली अट ही आहे की, या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही भारताची रहिवासी असायला हवी. यासाठी वयाची कुठलीही अट नाही. अल्पवयीन मुलीच्या नावाने नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकाने देखीलहे हे खाते उघडले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडण्यास परवानगी नाही, असेही ते म्हणाले.
advertisement
अयोध्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठी भविष्यवाणी; राम मंदिराचे मुख्य पुजारी काय म्हणाले?
या योजनेच्या अंतर्गत कमीत कमी 1000 तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेअंतर्गत दुसरे खाते उघडण्यासाठी, विद्यमान खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचे अंतर असावे. या योजनेत 7.5 टक्के प्रतिवर्ष व्याज मिळते. हे व्याज त्रैमासिक चक्रवाढ करून खात्यात जमा केले जाते. या योजनेतील ठेव रक्कम ठेवीच्या तारखेपासून 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्यूर होते. तर जमा केल्यावर एका वर्षानंतर उरलेली रकमेच्या 40 टक्के रक्कम काढता येते. ही सुविधा मॅच्यूरिटीच्या आधी फक्त एकदा उपलब्ध आहे.
advertisement
second hand car : सेकंड हँड कार खरेदी करताना ही काळजी नक्की घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
खातेदाराच्या मृत्यूनंतर किंवा जीवघेणा आजार झाल्यास वैद्यकीय मदतीसाठी ही रक्कम काढली जाऊ शकते. तसेच पालकाच्या मृत्यूमुळे खाते चालविण्यात अडचण आली तरीही पैसे काढता येतात. अशावेळी खाते बंद केल्यावर, योजनेसाठी निर्धारित व्याज दराने मूळ रकमेवर व्याज मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच खाते उघडल्यावर कोणत्याही कारणाने 6 महिन्यानंतर कोणत्याही वेळी ते बंद करता येते. अशावेळी मुदतपूर्व खाते बंद झाल्यास, योजनेसाठी निर्धारित व्याजदरामध्ये 2% व्याज कमी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Location :
Patna,Bihar
First Published :
May 25, 2024 5:51 PM IST
मराठी बातम्या/मनी/
महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे एकदम भारी, कमी पैशात मिळणार तब्बल इतकं व्याज