advertisement

Kolhapur: 10 बाय 10 खोली मोठ्या भावाच्या रक्ताने माखली, लहाना पोलीस स्टेशनला तसाच पोहोचला, कोल्हापूरमधली भयानक घटना

Last Updated:

रंगपंचमीच्या दिवशी दोन्ही भाऊ दिवसभर रंग खेळले.  त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास वाद सुरू झाला.

News18
News18
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून रंगपंचमीच्या दिवशी लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात बॉटल घालून खून केल्याची घटना घडली आहे. भावाचा खून केल्यानंतर भाऊ स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर राहिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील  राजारामपुरी भागात मातंग वसाहतीते ही घटना घडली आहे.  हर्षद विलास पांढरबळे असं मृत मोठ्या भावाचं नाव आहे. तर यश पांढरबळे असं खून करणाऱ्या लहान भावाचं नाव आहे. रंगपंचमीच्या दिवशी दोन्ही भाऊ दिवसभर रंग खेळले.  त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.  त्यानंतर रागाच्या भरात यश याने भाऊ हर्षदचा घरात बाटली डोक्यात टाकून खून केला. हे दोघेही १० बाय १० च्या खोलीत राहत होते. खोलीत यामुळे रक्ताने माखली होती.
advertisement
स्थानिकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. तोपर्यंत यश हा पोलीस स्टेशनमध्ये स्वत:हा हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळाच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
(सविस्तर बातमी लवकर)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: 10 बाय 10 खोली मोठ्या भावाच्या रक्ताने माखली, लहाना पोलीस स्टेशनला तसाच पोहोचला, कोल्हापूरमधली भयानक घटना
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement