second hand car : सेकंड हँड कार खरेदी करताना ही काळजी नक्की घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सेकंड हँड कार खरेदी करताना सर्व कागदपत्रे नक्की तपासावीत. कारच्या इतिहासाची पडताळणी करुन घ्यावी. कारची सर्व्हिसिंग आणि रिपेअर हिस्ट्री चेक करुन घ्यावी.
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाशी : चार चाकी कार खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, बजेटमध्ये बसत नसल्याने काही जण सेकंड हँड गाडी खरेदी करतात. मात्र, सेकंड हँड गाडी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला मोठे नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. जर लक्ष दिले गेले नाही तर तुम्हाला कुणी चोरीची कार विकू शकतो.
advertisement
त्यामुळे सेकंड हँड कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत झाशी येथील एआरटीओ डॉ. सुजीत सिंह यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सेकंड हँड कार खरेदी करताना सर्व कागदपत्रे नक्की तपासावीत. कारच्या इतिहासाची पडताळणी करुन घ्यावी. कारची सर्व्हिसिंग आणि रिपेअर हिस्ट्री चेक करुन घ्यावी.
अयोध्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठी भविष्यवाणी; राम मंदिराचे मुख्य पुजारी काय म्हणाले?
वाहन कोणत्याही कायदेशीर अडचणीत सापडले तर नाही ना, त्याबाबती तपासणी करू घ्यावी. तसेच मालकी आणि नोंदणी प्रमाणपत्र काळजीपूर्वक तपासावे. व्हीआयएन आणि इंजिन नंबरमध्ये फरक नसावा, हे सर्वात आधी लक्षात ठेवा. यासोबतच कर्जाची एनओसी आणि विमा रेकॉर्ड यांसारखी कागदपत्रे तपासा. यानंतर कारचा विमासुद्धा तुमच्या नावावर ट्रान्सफर करावा.
advertisement
अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरील मित्राशी झालं प्रेम, आत्महत्येची धमकी देत केलं लग्न, पुढे घडलं भयानक
ही सुद्धा तपासणी करा -
डॉ. सुजीत सिंह यांनी सांगितले की, सेकंड हँड कार खरेदी करताना फक्त बाहेरची बॉडी दाखवून निर्णय घेऊ नये. कारचा ब्रेक, सस्पेन्शन, एक्सल, या सर्वांची तपासणी करावी. कारला कोणत्याही एक्सपर्टला दाखवण्याची गरज नाही. जर असे केले नाही तर नंतर इंजिन ब्रेकडाउनमुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारचे ओडोमीटरसोबत काही छेडछाडतर झालेले नाही ना, तसेच ऐनालोग मीटरचीही तपासणी करून घ्या.
Location :
Jhansi,Uttar Pradesh
First Published :
May 25, 2024 4:47 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
second hand car : सेकंड हँड कार खरेदी करताना ही काळजी नक्की घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका