TRENDING:

Pooja Khedkar : कोण आहे वैभव कोकाट? ज्यांनी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आणलं, घटनेची Inside story

Last Updated:

Who Is Vaibhav Kokat : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरणाची इनसाईड स्टोरी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, प्रतिनिधी : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात (IAS Pooja Khedkar Updates)आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर आता युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली असून, तुमची उमेदवारी रद्द का करण्यात येऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस त्यांना युपीएससीकडून पाठवण्यात आली आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण एका ट्विटमुळे समोर आलं. वैभव कोकाट यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून 6 जुलै रोजी हे ट्विट केलं होतं.
News18
News18
advertisement

युपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकाळ संपण्याआधीच घेतला मोठा निर्णय

'प्रोबेशनरी IAS वापरतायेत AUDI कार ? नियम सांगतो कि खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लाऊन घेतला. शिवाय या खासगी गाडीला लालआणि निळा दिवा पण लाऊन घेतला. ऑडी कंपनीच्या अलिशान गाडीला लोगो आणि दिवा लावून कार्यालयात येणारे असे हे मोठे अधिकारी कोण याची चर्चा नेहमी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होत असतं. विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्यांच्या या गाडीचे दिवे दिवसासुद्धा चालू ठेवतात. या अधिकारी मॅडमचे ‘कार’नामे फक्त कार पुरते मर्यादित नसून वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून या अधिकारी मॅडमनी चक्क वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले आणि स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला. त्यांच्या या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केला असून या अहवालात कलेक्टर साहेबांनी ‘माझे कार्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारीच हवे तसेच मला शिपाई पाहिजे आणि हीच गाडी पाहिजे’ असा अधिकारी मॅडमचा हट्ट आहे असा उल्लेख केला. अधिकारी मॅडमचे वडील जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दम देतात कि, तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात, तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिची एवढी पोस्ट मिळणार नाही. माझ्या मुलीला त्रास दिला तर तुम्हाला पण भविष्यात या गोष्टीचा त्रास होईल अशी धमकी सुद्धा देतात. अनाठायी आग्रह करून दुरुस्त केलेले कार्यालयसुद्धा अधिकारी मॅडमना आवडले नाही. प्रोबेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्याना गाडी, शिपाई, दालन तसेच इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याचे कुठीलीही शासकीय तरतूद नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय त्यांना वापस देण्याचे सूचित केले. त्यावर पूजा खेडकर यांनी whatsapp मेसेज करून हा माझा अपमान झाल्याचे म्हटले आहे. प्रोबेशनवर असणाऱ्या या अधिकाऱ्याची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही. जिल्ह्यातील शासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी जिल्हा बदलून द्यावा' असा विस्तृत शेरा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात दिला आहे. नव्या नव्या अधिकाऱ्यांना एवढा माज कशाचा आहे ? 10-15 वर्षांपूर्वी व त्या आधी शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आपल्या कामाप्रती अन अधिकाराप्रती प्रचंड जागरूकता अन स्वभावात नम्रपणा आहे पण गेल्या 5-6 वर्षांपासून शासकीय सेवेत आलेल्या अनेक महाभागांचे नोकरीविषयीचे हेतू केवळ हवाबाजीचे आहेत. लवकर मोठे व्हायचे आहे, श्रीमंतीचे आयुष्य जगायचे आहे, रुबाब झोडायचा आहे. इंस्टाग्रामवर कुल राहायचे आहे. सोशल मीडियावर तत्वज्ञान झाडायचे आहे. अतिशय भंपक लाट हि गेल्या काही वर्षात प्रशासकीय सेवेत आली आहे. काही अपवाद वगळता नव्यापेक्षा पूर्वीचे जुने अधिकारी चांगले अशी म्हणायची वेळ आली आहे.' असं ट्विट वैभव कोकाट यांनी केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान यानंतर त्यांनी 'एका ट्विट मध्ये मोठी ताकद असते, आपण निर्भिडपणे लिहिलं पाहिजे. काळ कठीण असला तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरं बोललं पाहिजे. व्यवस्थेविरोधात लिहा, बोला. व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात आहे...' असं एक ट्विट देखील त्यांनी केलं आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pooja Khedkar : कोण आहे वैभव कोकाट? ज्यांनी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आणलं, घटनेची Inside story
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल