TRENDING:

पुण्यात पाण्याच्या टाकीमागे पत्र्याचं शेड; आतलं दृश्य पाहून पोलिसांनीही लावला डोक्याला हात, एकाला अटक

Last Updated:

दौंड तालुक्यातील खामगाव येथे यवत पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात तब्बल ४ लाख ८७ हजार ९०० रुपये किमतीचा ८ किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे यवत पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात तब्बल ४ लाख ८७ हजार ९०० रुपये किमतीचा ८ किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.
एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे (प्रतिकात्मक फोटो)
एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

गुप्त माहितीच्या आधारे छापा

खामगाव येथील एका पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गांजाची साठवणूक करून तो विकला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी २७ मार्च रोजी अमली पदार्थ विरोधी पथक आणि यवत पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी छापा टाकला. झडती दरम्यान पोलिसांना तिथे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा मिळून आला.

advertisement

या कारवाईत पोलिसांनी आकाश मोहिते (वय २३, रा. खामगाव) याला जागीच ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आकाशने कबुली दिली की, हा गांजा त्याचा मित्र सागर चव्हाण (रा. खामगाव) याचा असून त्याच्या सांगण्यावरूनच तो विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सागर चव्हाण सध्या फरार आहे.

advertisement

अटक करण्यात आलेल्या आकाश मोहिते याला न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय कोल्हे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. या गांजा तस्करीचे धागेदोरे नेमके कुठे पोहोचले आहेत, याचा तपास आता पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा कारवाया पुढेही सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पाण्याच्या टाकीमागे पत्र्याचं शेड; आतलं दृश्य पाहून पोलिसांनीही लावला डोक्याला हात, एकाला अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल