पुणे : शॉपिंग हा तसा महिलांच्या आणि मुलींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मुलींचा मूड चांगला असो किंवा नसो पण मुलींना शॉपिंग केल्यानंतर आनंद मिळतो. पुणे शहरातही शॉपिंगसाठी अनेक प्रसिद्ध असे मार्केटस आणि वेगवेगळी ठिकाणे आहेत. यातच एक म्हणजे हिंजवडी जवळ असलेल्या फ्ली मार्केट.
या मार्केटमध्येही विविध प्रकारची ज्वेलरी, कपडे, विविध वस्तू याठिकाणी पाहायला मिळतात. त्यांची किंमत जर पाहिली तर 10 रुपयांपासून या वस्तू सुरू होतात. त्यामुळे याठिकाणी नेमक्या कोणकोणत्या वस्तू मिळतात, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
पुण्यातील हिंजवडी वाकडजवळ हे फ्ली मार्केट आहे. मागील वर्षभरापासून हे मार्केट सुरू झाले. येथे अनेक प्रकारच्या वस्तू या पाहायला मिळतात. 10 रुपयांपासून ते अगदी 1200 रुपयांपर्यंत वस्तू आहेत. त्यांची क्वालिटी ही अतिशय चांगली असल्यामुळे लोकांची गर्दीही इथे होत असते. तसेच एकाच ठिकाणी इतक्या वस्तू मिळत असल्याने नागरिकांना कुठंही जायची गरज नाही. कपड्यांसोबत वस्तूदेखील इथे मिळतात.
ज्वेलरी, कॉस्मेटिक, टी शर्ट, जिन्स,कुर्ती, हे वेगवेगळ्या साईझमध्ये आहेत. तर अगदी छोट्या क्लिप, कानातले, टॉप कुर्ती, ड्रेस मटेरिअल, जीन्स जॅकेटचे व्हरायटीसुद्धा इथे उपलब्ध आहे. या वस्तू रोजच्या वापरासाठी किंवा कुठे बाहेर जाण्यासाठीही वापरू शकता. त्यामुळेच तुम्हाला अशा अगदी स्वस्तात वस्तू खरेदी करायचं तर इथे नक्कीच येऊ शकतात, अशी माहिती व्यावसायिक राकेश तारू यांनी लोकल18 शी बोलताना दिली.