पुणे : अनेक प्रसिद्ध असणाऱ्या मिसळ आपण खाल्या असतील. जसे की पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, बेडेकर मिसळ. मात्र, पिंपरी चिंचवडमधील मिसळ वाडा या ठिकाणी चक्क चिझ मिसळ थाळी मिळते. याबरोबर इथे उपवसाची थाळी तसेंच स्पेशल मिसळ थाळी आणि पावभाजीही मिळते. येथील चव इतकी चांगली आहे की ही मिसळ खाण्यासाठी याठिकाणी लोकांची प्रचंड गर्दीही होत असते. म्हणून या चिझ मिसळचे वैशिष्ट्य काय आहे, ती कशी तयार केली जाते, हे जाणून घेऊयात.
advertisement
मागील 10 महिन्यांपासून चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात असलेल् मिसळ वाडा हॉटेल सुरू झाले. इथे रेग्युलर मिसळ, चिझ मिसळ आणि स्पेशल मिसळ मिळते. चिझ मिसळमध्ये मटकी चिवडा आणि ताक दिल जाते आणि यामध्ये पिझ्झासाठी वापरले जाणारे नॉर्मल पद्धतीचे चिझ न वापरता चांगले चिझ वापरले जाते.
आजचा दिवस चिंतामुक्त करणारा, शुक्रवार अन् अक्षय्य तृतीयेचा अद्भुत योग, कर्जमुक्तीसाठी करा हे उपाय
ते पूर्ण मेल्ट होते. त्यामुळे मिसळचा तिखटपणा कमी होतो. त्याचप्रमाणे स्पेशल चिझ मिसळदेखील याठिकाणी मिळते. यामध्ये अंगूर मलाई, आंबा बर्फी, पापड, ताक आणि अनलिमिटेड रस्सा पावदेखील दिले जाते.
आजकाल अनेक मुलांना वाड्याबदल माहिती नसते. यामुळे हॉटेलची थीम पाहिली तर ती पुण्यातील जे प्रसिद्ध वाडे आहेत त्यावर आधारित काही चित्रे इथे पाहिला मिळतात. यामुळे लोकांना त्या वाड्याबदल माहिती मिळते.
किंमत किती -
या थाळीची किंमतीचा विचार केला तर 90 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत आहे. ही मिसळ थाळी खाण्यासाठी तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबतही जाऊ शकता. याची चव ही अतिशय अप्रतिम अशी आहे. त्यामुळे या मिसळवाड्याला लोकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे, अशी माहिती अर्चना पायगुंडे यांनी दिली आहे.