TRENDING:

Pune Crime News : पुण्यात खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या; दोघांना घेतलं ताब्यात

Last Updated:

पुण्यात मंगळवारी मध्यरात्री एका तरुणाचा गुलटेकडी परिसरात खून झाल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी जामिनावर असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना समोर आल्या. हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर आता आणखी एक हत्या झाली आहे. गुलटेकडी परिसरात मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आलीय. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींनी ही हत्या केलीय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सुनील सरोदे याची हत्या रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे या दोघांनी केलीय. दोघेही मोक्यातील आरोपी असून ते जामिनावर बाहेर होते. दरम्यान, हत्या का करण्यात आली हे अद्याप समोर आलेलं नाही.

advertisement

Pune Accident News : पुण्यात पुन्हा डंपरच्या धडकेमुळे भीषण अपघात, पिता-पुत्राचा मृत्यू

हडपसरमध्ये मोबाईलचा हॅाटस्पॅाट न दिल्यान चार आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांचा खून केला. ⁠आरोपींना एनर्जी ड्रींक खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांना ॲानलाईन पेमेंट करायचे होते. ॲानलाईन पेमेंट करण्यासाठी आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट मागितले. कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट देण्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यात आरोपींनी कुलकर्णी यांच्यावर धारधार शस्रांनी वार केला. त्यात कुलकरर्णी यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

रविवारी रात्री पुण्यातील नानापेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या प्रकरणी वनराजच्या सख्ख्या बहिणीसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या टोळीतील १५ जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाना पेठेत वनराजवर आधी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर कोयत्याने वार केले होते.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime News : पुण्यात खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या; दोघांना घेतलं ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल