प्रकरण काय?
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागाचे पथक रविवारी (२९ मार्च) पेट्रोलिंग करत होते. यावेळी सहायक फौजदार दीपक साबळे यांना खात्रीलायक बातमी मिळाली. त्यांना समजलं की, जुन्नरमधील एक तरुण आपल्या 'सुझुकी एस्टीम' (क्र. MH 12 DE 2767) कारमधून तलवारींचा साठा घेऊन नारायणगावला येत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून संशयित सालीम साजिद पठाण (वय २०, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची झडती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला. गाडीत १० मोठ्या आणि २ लहान अशा एकूण १२ धारदार तलवारी लपवून ठेवल्या होत्या. प्राथमिक तपासात या तलवारी विक्रीसाठी आणल्याचे समोर आले आहे. ही अतिशय धक्कादायक बाब होती, कारण या तलवारी कोणाला विकल्या जाणार होत्या आणि याचा वापर नेमका कशासाठी होणार होता, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील करत आहेत. या तलवारी नेमक्या कोणाला विकल्या जाणार होत्या आणि यामागे मोठी टोळी आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
