TRENDING:

Pune News : पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

Last Updated:

Zika Virus Pune : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.
News18
News18
advertisement

आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये

पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

advertisement

झिका व्हायरसची लक्षणं (Zika Virus Symtpoms In Marathi)

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल