TRENDING:

ज्याची अतुरतेने वाट पाहिली ती वेळ आलीच! आजपासून नवपंचम योग, ५ राशींना करणार मालामाल

Last Updated:

Astrology News : ज्योतिषशास्त्रात फेब्रुवारी महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. या काळात होणारी ग्रहांची हालचाल अनेकांच्या आयुष्यात निर्णायक बदल घडवून आणते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्योतिषशास्त्रात फेब्रुवारी महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. या काळात होणारी ग्रहांची हालचाल अनेकांच्या आयुष्यात निर्णायक बदल घडवून आणते. यंदा फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहसंयोगांचे एक आगळेवेगळे पर्व पाहायला मिळणार असून, 3 फेब्रुवारीपासून एक प्रभावशाली नवपंचम योग निर्माण होत आहे. या योगामुळे काही निवडक राशींच्या जीवनात यश, प्रगती आणि समाधानाचे नवे दरवाजे खुले होण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
astrology news
astrology news
advertisement

बुध आणि गुरुच्या संयोगातून नवपंचम योगाची सुरुवात

ज्योतिषशास्त्रानुसार, 3 फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत आधीच गुरु ग्रह विराजमान असल्याने बुध आणि गुरु यांच्यात नवपंचम योग तयार होईल. त्यानंतर 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह देखील कुंभ राशीत प्रवेश करणार असून, त्यामुळे गुरु-शुक्र नवपंचम योग निर्माण होईल. हे दोन्ही योग बौद्धिक क्षमता, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे मानले जातात.

advertisement

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नवपंचम योगामुळे तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रशंसा मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. मेहनतीचे फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवे नियोजन करता येईल.

मिथुन राशी

advertisement

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ बदल घडवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य प्रस्ताव मिळू शकतो. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. शिक्षण, प्रशिक्षण किंवा कौशल्यविकासासाठी हा काळ अनुकूल असून प्रवासातूनही लाभ होऊ शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग करिअरमध्ये मोठी उंची गाठण्यास मदत करू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि सामाजिक संपर्क मजबूत होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार किंवा आर्थिक लाभाचे योग आहेत. कौटुंबिक पातळीवरही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात.

advertisement

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना विशेष शुभ मानला जात आहे. अनेक दिवसांपासून केलेले प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. स्पर्धा परीक्षा, नोकरीचे निकाल किंवा मुलाखतींचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, तर नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ योग्य ठरू शकतो.

मीन राशी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

मीन राशीसाठी नवपंचम योग महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूल ठरेल. नोकरी किंवा कार्यक्षेत्रात बदल करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशी शिक्षण किंवा नोकरीचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. समाजातील मान्यवर व्यक्तींशी संपर्क वाढेल आणि आर्थिक लाभाचे संकेत मिळतील.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
ज्याची अतुरतेने वाट पाहिली ती वेळ आलीच! आजपासून नवपंचम योग, ५ राशींना करणार मालामाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल