नवरात्रोत्सवाला ठिकठिकाणी धुमधडाक्यात सुरुवात झाली. या काळात देवीकडे मनोभावे प्रार्थना केल्यास देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. शिवाय कुंडली दोषदेखील दूर होतात. ज्योतिषी डॉ. कुणाल कुमार झा यांनी त्यासाठी राशीनुसार काही उपाय सांगितले आहेत.
advertisement
ज्या राशींवर शनीचा प्रभाव असतो, त्यांनी या काळात उपाययोजना करणं लाभदायी ठरू शकतं, असं ज्योतिषी म्हणाले. त्या राशी नेमक्या कोणत्या पाहूया.
मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. या राशीच्या व्यक्तींसाठी सध्या साडेसातीचा काळ सुरू आहे. त्यामुळे त्यांनी द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणीच्या पूजेसह दुर्गा सप्तशतीचा चतुर्थ अध्याय आणि रामायणाच्या सुंदरकांडाचं वाचन करणं लाभदायी ठरेल, असं ज्योतिषी म्हणाले.
कुंभ राशीवरदेखील शनी ग्रहाचा प्रभाव असतो. या राशीच्या व्यक्तींनी द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी मातेची पूजा करावी, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
मीन राशीच्या व्यक्तींसाठी सध्याचा काळ हा साडेसातीचा आहे. स्वामी ग्रह बुध असल्याने या राशीच्या व्यक्तींनी महागौरी आणि जगदंबेची पूजा करावी. यामुळे लाभदायी अशा घटना घडतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g