शब्दांचं शस्त्र, शस्त्राहून घातक!
आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्तीकडे कोणत्याही शस्त्रापेक्षा आपलं बोलणं (शब्द) हे जास्त शक्तिशाली शस्त्र असतं. या शब्दांनी तो दुसऱ्याला खूप दुःख देऊ शकतो. चाणक्यांच्या मते, एखादी व्यक्ती दुसऱ्याला शस्त्रानं जेवढं दुखावू शकत नाही, त्यापेक्षा जास्त शब्दांनी दुखावू शकते.
पालकांचा अनादर हे महापाप
चाणक्यांच्या मते, जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांबद्दल वाईट बोलते, त्यांचा अनादर करते, ती महापापी असतो. आई-वडील हे देवाप्रमाणे असतात. रागाच्या भरात जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांबद्दल अपशब्द बोलतो, त्याला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो.
advertisement
देवही क्षमा करत नाही
आचार्य चाणक्य सांगतात की, मुलाचं असं वागणं पालकांचं हृदय तोडून टाकतं. त्यांना यामुळे खूप वेदना होतात. ही एक अशी चूक आहे, जी कदाचित आई-वडील एकदा माफ करतीलही, पण देव मात्र कधीही माफ करत नाही. त्यामुळे आपल्या शब्दांचा वापर जपून करावा आणि विशेषतः आई-वडिलांशी बोलताना त्यांचा आदर राखावा.
हे ही वाचा : ऐषोआरामी जीवनाचा केला त्याग, 26 वर्षांच्या 2 तरुणी झाल्या संन्यासी; आई-वडिलांना झाला आनंद!
हे ही वाचा : 76 वर्षे झाली, या मंदिरात कधीच चुकली नाही 'महात्मा गांधी'ची पूजा; दिवसातून तीन वेळा आरती!