76 वर्षे झाली, या मंदिरात कधीच चुकली नाही 'महात्मा गांधी'ची पूजा; दिवसातून तीन वेळा आरती!

Last Updated:

मंगळुरूच्या कणकनाडी येथील श्री ब्रह्मबैदरकला गरडी क्षेत्रात महात्मा गांधींच्या पुतळ्याची 76 वर्षांपासून नित्य पूजा केली जाते. 15 डिसेंबर 1948 रोजी उभारलेली ही मूर्ती दररोज...

Gandhi statue
Gandhi statue
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या भारताचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आजही देशभरात महात्मा गांधी यांना पूज्य समजलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, गेली 76 वर्षे मंगलूरमधील प्रसिद्ध गराडी परिसरात गांधीजींच्या पुतळ्याची दररोज पूजा केली जाते? विशेष म्हणजे, गांधीजींच्या जयंतीला इथे पालखी सोहळा देखील आयोजित केला जातो.
मंगलूरच्या कंकानाडी येथील श्री ब्रह्मबैदरकला गराडी क्षेत्रात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला फुलांनी सजवून त्यांची पूजा आणि नैवेद्य दाखवण्यात येतो. गांधीजींच्या जयंतीनिमित्त केली जाणारी ही एक खास पूजा असते.
15 डिसेंबर 1948 रोजी स्थापना
गांधीजींनी सत्य, शांती, अहिंसा आणि त्यागाच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे अहिंसेचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी 15 डिसेंबर 1948 रोजी गराडी परिसरात गांधीजींचा पुतळा बसवण्यात आला. तेव्हापासून, गेली 76 वर्षे राष्ट्रपित्याची दररोज पूजा केली जात आहे.
advertisement
दिवसातून तीन वेळा पूजा
गराडी परिसरात गांधीजींच्या पुतळ्याची देवांप्रमाणेच पूजा केली जाते. दिवसातून तीन वेळा आरती केली जाते आणि दूध-केळीचा नैवेद्य दाखवला जातो. विशेष म्हणजे, स्वातंत्र्य संग्रामादरम्यान गांधीजी तीन वेळा मंगलूरला आले होते आणि त्यांनी लोकांना प्रेरणा दिली होती. त्यामुळेच इथे त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची पूजा केली जाते.
कंकनाडी गराडी हे तुलुनाडूचे अमर वीर जोडी कोठी-चेन्नईय्या यांचे पवित्र पूजेचे ठिकाण आहे. दरवर्षी इथे पाच दिवसांच्या उत्सवासाठी लाखो लोक येतात. मंदिराच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की हे सर्व लोक गांधीजींच्या विचारांनी प्रेरित आहेत. थोडक्यात, गराडीमध्ये गांधीजींच्या आदर्शांचे पालन केले जाते आणि त्यांच्या पुतळ्याची विशेष प्रकारे पूजा आणि सन्मान केला जातो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
76 वर्षे झाली, या मंदिरात कधीच चुकली नाही 'महात्मा गांधी'ची पूजा; दिवसातून तीन वेळा आरती!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement