बाप रे! पोटात हे काय सापडलं? 'ही' महिला खात होती स्वतःचेच केस; जेव्हा त्रास असह्य झाला...

Last Updated:

मंडी नेरचौक मेडिकल कॉलेजमध्ये एका महिलेला उलटी व पोटदुखीमुळे दाखल करण्यात आले. तपासणीत तिच्या पोटात अज्ञात वस्तू आढळली. शस्त्रक्रियेनंतर त्या वस्तूचा खुलासा झाला - ती होती एक...

Hair ball in stomach
Hair ball in stomach
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेच्या पोटातून ऑपरेशन करून तब्बल एक फूट लांबीचा केसांचा गोळा काढण्यात आला आहे. पोटात तीव्र वेदना आणि उलटी होत असल्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला तात्काळ प्रथमोपचार दिला. त्यानंतर तिचं अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन करण्यात आलं. या तपासणीत डॉक्टरांना महिलेच्या पोटात काहीतरी विचित्र वस्तू असल्याचं दिसलं. डॉक्टरांनी यशस्वीरित्या ऑपरेशन करून ती वस्तू बाहेर काढली, तेव्हा तो एक फूट लांबीचा केसांचा गोळा असल्याचं समोर आलं.
ती महिला खात होती स्वतःचेच केस
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंडीच्या नेरचौक मेडिकल कॉलेजमध्ये घडली आहे. ज्या महिलेच्या पोटातून हा केसांचा गोळा काढण्यात आला आहे, ती मानसिक रुग्ण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती स्वतःचे केस खात होती, त्यामुळे तिच्या पोटात केसांचा मोठा गोळा तयार झाला होता.
advertisement
डॉ. राहुल मृगपुरी आणि डॉ. अजय यांच्या नेतृत्वाखाली महिलेची दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) शस्त्रक्रिया करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये डॉ. श्यामली, पंकज आणि नर्सिंग स्टाफ चंद्र ज्योती व डिंपल यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं असून आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.
ट्रायकोबेझोर' या दुर्मिळ आजारात होतं असं...
या घटनेची सखोल चौकशी केल्यावर, तज्ज्ञांनी सांगितलं की हा 'ट्रायकोबेझोर' नावाच्या एका दुर्मिळ आजाराचा प्रकार आहे. या स्थितीत केस किंवा इतर पचायला कठीण असलेले पदार्थ पोटात जमा होतात. वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. रजनीश शर्मा यांनी या दुर्मिळ घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, हे फक्त शस्त्रक्रियेचं प्रकरण नाही, तर मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचं हे एक उदाहरण आहे. समाजात मानसिक आजारांबद्दल जनजागृतीचा मोठा अभाव असल्यामुळे अशा गंभीर परिस्थिती निर्माण होतात, असंही ते म्हणाले.
advertisement
असाच एक प्रकार यापूर्वीही घडला होता
फेब्रुवारी 2025 मध्ये याच मेडिकल कॉलेजमध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी एका मानसिक रुग्णाच्या पोटातून अनेक चाकू, नट आणि चमचे यासारख्या वस्तू काढण्यात आल्या होत्या. अशा प्रकरणांमध्ये, मानसिक आजारांवर वेळीच योग्य उपचार आणि त्यांची ओळख पटवणे खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे असे गंभीर प्रकार टाळता येतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
बाप रे! पोटात हे काय सापडलं? 'ही' महिला खात होती स्वतःचेच केस; जेव्हा त्रास असह्य झाला...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement