पंढरपुरात राहणारे बजरंगी धोत्रे हे पिढ्यानपिढ्या मूर्ती बनविण्याचे काम करतात. दगडापासून मूर्ती बनवण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. राजस्थान, जयपूर येथून मूर्ती बनविण्यासाठी दगड आणला जातो. तसेच ब्लॅक मार्बल, पांढरा मार्बल तर कर्नाटकातून शाळीग्राम आणले जाते. श्री विठ्ठल, रुक्मिणी माता, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि इंतर संतांच्या 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत मूर्ती बनवतो. या मूर्ती हातानेच बनवल्या जातात, असे धोत्रे सांगतात.
advertisement
Ashadhi Wari 2025: पंढरीतला सौभाग्य अलंकार, आषाढीला मोठी मागणी, लाखेचा चुडा बनतो कसा?
3 फुटाची मूर्ती 70 हजारांना
आषाढी वारीत सर्वात जास्त मूर्ती श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना मागणी असते. तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार यांच्या मूर्ती देखील भाविक खरेदी करतात. जवळपास 15 ते 20 कारीगर दोन ते तीन महिन्यापासूनच मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात करतात. या मूर्तींची किंमत त्यांच्या आकारावर ठरवली जाते. तीन फुटाची एक मूर्ती 60 ते 70 हजार रुपयापर्यंत विकली जाते. तर 5 फुटाच्या एका मूर्तीचा दर 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत आहे. आषाढी वारी कालावधीत 2 ते 4 लाखांची उलाढाल होत असल्याची माहिती मूर्तिकार बजरंगी धोत्रे यांनी दिली.
पंढरपुरात मूर्तींना मोठी मागणी
दगडापासून मूर्ती बनविणारे कारखाने पंढरपूर मध्ये जवळपास 10 ते 12 आहेत. तर या मूर्ती बनवणाऱ्या व्यवसायावर 200 ते 300 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पंढरपुरात सर्वाधिक मूर्ती विठ्ठल रुक्मिणीच्या तयार केल्या जातात. दगडाला वेगवेगळा आकार देऊन आकर्षक मूर्ती बनवली जाते. तर हाताने घडवलेल्या मूर्तीला भाविकांतून मोठ्या प्रमाणावर मागणी असते, अशी माहिती मूर्तिकार बजरंगी धोत्रे यांनी दिली.