Ashadhi Wari 2025: पंढरीतला सौभाग्य अलंकार, आषाढीला मोठी मागणी, लाखेचा चुडा बनतो कसा?

Last Updated:

Ashadhi Wari 2025: पंढरपुरात आलेल्या महिला भाविक इथे मिळणारा लाखेचा चुडा आवर्जून हातात घालतात. या चुड्याबाबत जाणून घेऊ.

+
Ashadhi

Ashadhi Wari 2025: पंढरीतला सौभाग्य अलंकार, आषाढीला मोठी मागणी, लाखेचा चुडा बनतो कसा?

सोलापूर – पंढरीत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर महिला आवर्जून लाखेचा चुडा हातात घालतात. हा चुडा सुवासिनी महिला रुक्मिणी मातेचा आशीर्वाद मानतात. त्यामुळे लाखेचा चुडा केवळ एक दागिना नसून श्रद्धेचा भाग बनला आहे. या संदर्भात अधिक माहिती चुडा बनविणारे कारागीर सागर ढवारे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
सागर हे लाखेचा चुडा बनविण्याचे काम वयाच्या 15 व्या वर्षापासून करत असून हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. पंढरपुरात आलेल्या महिला भाविक रुक्मिणी मातेचा आशिर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात. तसेच महिलांसाठी अनेकजण सौभाग्याचं लेणं म्हणून गावी देखील घेऊन जातात. विशेष म्हणजे परंपरागत या चुड्यांची निर्मिती पंढरपुरातच होत आहे.
advertisement
लाखेचा चुडा बनविण्याचा कच्चा माल मुंबई येथून आणला जातो. आषाढी वारीच्या जवळ पास दोन महिने अगोदर पासून लाखेचा चुडा बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. दिवसभरात 10 ते 15 जण मिळून 4 ते 5 हजार नग लाखेचा चुडा बनविले जातात. हा चुडा तयार झाल्यावर त्याची मंदिर परिसरात विक्री केली जाते. या व्यवसायातून केवळ आषाढी वारीच्या काळात 2 ते 3 लाखांची उलाढाल होत असल्याचे सागर सांगतात.
advertisement
दरम्यान, लाखेच्या चुड्याने पंढरपूर मधील अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. पंढरपुरात जवळपास 40 हून अधिक कारखान्यात जुडा बनवला जातो. बदलत्या काळात आकर्षक डिझाईनमध्ये लाखेचा चुडा बनवला जातोय आणि त्याला भाविकांची पसंती देखील मिळतेय. पंढरपूरच्या स्थानिक बाजारात महिला भाविक आवर्जून हातात चुडा घालतात. तसेच सौभ्यागाचं लेणं म्हणून इतरांना देखील देतात. चुडा बनविण्याचा व्यवसाय हा व्यवसाय नसून चुडा बनविणाऱ्या कारागिरांसाठी श्रद्धेचा व्यवसाय बनला आहे, अशी माहिती चुडा कारागीर सागर ढवारे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: पंढरीतला सौभाग्य अलंकार, आषाढीला मोठी मागणी, लाखेचा चुडा बनतो कसा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement