संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या संपूर्ण तयारीबाबत आळंदी देवस्थान कमिटीने माहिती दिली असून, मार्गावरील वाहतूक नियोजन, वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि अग्निशमन सेवा याबाबत पूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा वेळापत्रक 2025
advertisement
19 जून – आळंदी येथून पालखी प्रस्थान
20 जून – आळंदी ते पुणे (29 कि.मी)
21 जून – पुणे मुक्काम
22 जून – पुणे ते सासवड (32 कि.मी)
23 जून – सासवड मुक्काम
24 जून – सासवड ते जेजुरी (16 कि.मी)
25 जून – जेजुरी ते वाल्हे (12 कि.मी)
26 जून – वाल्हे ते लोणंद (20 कि.मी) – माऊलींना निरास्नान
27 जून – लोणंद ते तरडगाव (8 कि.मी)
28 जून – तरडगाव ते फलटण (21 कि.मी)
29 जून – फलटण ते बरड (18 कि.मी)
30 जून – बरड ते नातेपुते (21 कि.मी) – बरड येथे गोल रिंगण
1 जुलै – नातेपुते ते माळशिरस (18 कि.मी) – सदाशिवनगर येथे गोल रिंगण
2 जुलै – माळशिरस ते वेळापूर (19 कि.मी) – खुडूस येथे गोल रिंगण
3 जुलै – वेळापूर ते भंडी शेगाव (21 कि.मी) – ठाकूरबुवा समाधी, बंधू भेट सोहळा
4 जुलै – भंडी शेगाव ते वाखरी (10 कि.मी) – बाजीराव विहीर येथे उभं रिंगण
5 जुलै – वाखरी ते पंढरपूर – वाखरी येथे गोल रिंगण, पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
6 जुलै – देवशयनी आषाढी एकादशी
10 जुलै – पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास
या वारीत लाखो भाविक विठुनामाच्या गजरात सहभागी होत असून, या अध्यात्मिक यात्रेमुळे संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय.






