Ashadhi Wari 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान, मुक्काम अन् रिंगण कुठे? संपूर्ण वेळापत्रक
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज यांची पालखीचे देहूहून पंढरीसाठी प्रस्थान होणार आहे. या पालखीचे रिंगण आणि मुक्काम संपूर्ण वेळापत्रक पाहू.
पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या पालखी सोहळ्याला आज, 18 जूनपासून सुरुवात होत आहे. देहू येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानकडून यंदाच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. चांदीच्या रथाला झळाळी देण्यात आली आहे.
आषाढी वारीसाठी आज दुपारी अडीच वाजता देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली आहे.
देहूत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराच्या आत 42 व बाहेर ८ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मंदिराचा कळस फुलांनी सजवला आहे. यंदा संस्थानने तीन नवीन बैलजोड्या खरेदी केल्या असून अकलूजच्या मोहिते-पाटील यांचा मानाचा अश्व आज देहूत दाखल होईल.
advertisement
पालखीचा मुक्काम
18 जून – देहू
19 जून – आकुर्डी
20 जून – नाना पेठ, पुणे
21 जून – निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे
22 जून – लोणी काळभोर
23 जून – यवत
24 जून – वरखंड
25 जून – उंडवडी गवळ्याची
advertisement
26 जून – बारामती
27 जून – संसर
28 जून – निमगाव केतकी
29 जून – इंदापूर
30 जून – सराटी
1 जुलै – अकलूज
2 जुलै – बोरगाव श्रीपूर
3 जुलै – पिराची कुरोली
4 जुलै – वाखरी
5 जुलै – पंढरपूर
पालखी मार्गातील वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळे:
गोल रिंगण:
बेलवडी
advertisement
इंदापूर
अकलूज
उभे रिंगण:
माळीनगर
बाजीराव विहीर
वाखरी (पादुका आरतीसह)
इतर आकर्षण:
काटेवाडीत मेंढ्यांचे रिंगण
सराटी येथे पादुकांना नीरास्नान
तोंडले-बोंडले येथे धावा
दरमय्न, यंदा पालखी रथाच्या पुढे 27 दिंड्या आणि मागे 370 दिंड्या सहभागी होणार आहेत. सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक उपस्थित राहणार असून, अखंड नामस्मरणात हा अध्यात्मिक प्रवास पार पडणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jun 18, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान, मुक्काम अन् रिंगण कुठे? संपूर्ण वेळापत्रक








