TRENDING:

astrology: या 5 राशींचे नशीब जोरावर! प्रेमप्रकरणात मिळेल यश

Last Updated:

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 11 सप्टेंबर 2024 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिवसासाठीचा सारांश : नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. या गोष्टींपासून स्वतःचे संरक्षण करा. सकारात्मक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळू शकेल. मनातली जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. सकारात्मक परिवर्तन होईल. योग्य वेळ येईल यावर विश्वास ठेवा. आशीर्वाद मिळवा. यामुळे वैयक्तिक विकास होईल आणि मनाला समाधान मिळेल.
News18
News18
advertisement

मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल) : नवीन व्यक्तीशी भेट नुकसानदायक ठरू शकते. हा योगायोग असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही नियती असू शकते. मनातील विचारानुसार कृती करा. हे विचार तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. पहिलं पाऊल टाकण्यास घाबरू नका. नवीन संधींचा लाभ घ्या. जुन्या अनुभवातून तुमचा अर्थविषयक दृष्टिकोन तयार झाला आहे. नवीन अपडेट स्वीकारा. रोख रकमेचा प्रवाह कसा सुरू राहील यावर लक्ष केंद्रित करा. खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या. निरोगी शरीर आणि यांत्रिक जीवनामुळे वैचारिक स्पष्टता येईल. स्वतःची काळजी घ्या. योग्य दिनचर्या तयार करा.

advertisement

LUCKY Sign - A Handmade Paper Article

LUCKY Color - A Magenta

LUCKY Number - 24

वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे) : प्रेमासाठी केलेल्या प्रार्थनेचे योग्य उत्तर मिळेल. तुमच्या मनात असलेली निर्मळ आणि परिपूर्ण नातेसंबंधांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या वाटचालीवर विश्वास ठेवा. लेखनात यश मिळू शकते. गरज वाटल्यास नाटकी पद्धतीने वागण्याची कला आत्मसात करा. करिअरपूर्वीच्या तुलनेत जास्त अर्थपूर्ण असेल. नवीन संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नियमित तपासणी आणि सल्ल्यासाठी नियोजन तयार करा. आरोग्याला प्राधान्य द्या. स्वतःची योग्य काळजी घेतली तर मनःशांती सहज मिळेल.

advertisement

LUCKY Sign – A Carnation

LUCKY Color - Purple

LUCKY Number – 5

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) : तुम्हाला हवं असलेलं प्रेम लवकरच मिळू शकतं. नवीन संधीसाठी तयार राहा. परिपूर्ण नातेसंबंधांसाठी तुमचं मन तुम्हाला मार्गदर्शन करेल. करिअरमध्ये यश मिळू शकते. धैर्य ठेवत प्रयत्न करा. जोखीम स्वीकारण्यास घाबरू नका. तुमची मेहनत आणि समर्पण फलदायी ठरेल. समृद्धी येईल. खर्च करण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. आर्थिक स्थितीवर बारकाईनं नजर ठेवा. नवीन संधीचा फायदा घ्या. काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध खर्चामुळे आर्थिक स्थिरता कायम ठेवू शकाल. तसेच समृद्धी देखील येईल. समस्येचं निराकरण करण्यासाठी सक्रिय पावलं उचला आणि आरोग्यास प्राधान्य द्या. स्वतःची काळजी घेण्याची सवय लावा. शारीरिक गरजांकडे लक्ष द्या.

advertisement

LUCKY Sign – A Brown Bag

LUCKY Color – Neon Pink

LUCKY Number – 6

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) : प्रेमजीवनात महत्त्वाच्या गोष्टींची निवड करावी लागेल. यात नवीन नातेसंबंध, वचनबद्धता किंवा जुनं नातं पुन्हा सुरू करणं या गोष्टींचा समावेश असेल. यासाठी मनातले विचार, आंतरिक मार्गदर्शन उपयुक्त ठरतील. तुमच्या मार्गात बदल होऊ शकतो. हा यश आणि नवीन संधीचा संकेत असेल. त्यासाठी तुम्ही अनुकूल आणि लवचिक असायला हवं. नवीन सुरुवात होऊ शकते किंवा नवीन संधी मिळू शकते. नवीन नोकरी मिळेल किंवा उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळू शकेल. या संधीचा फायदा घ्या. खर्च करण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. विश्रांतीसाठी वेळ काढा. शरीराचे पोषण कसे होईल याकडे लक्ष द्या. निर्सगाच्या सान्निध्यात जा. तुम्हाला आनंद देणाऱ्या सर्जनशील आणि अर्थपूर्ण गोष्टी करण्यासाठी ही वेळ चांगली आहे.

advertisement

LUCKY Sign – A Ceramic Vase

LUCKY Color – Powder Blue

LUCKY Number – 16

Radha Ashtami 2024: राधाअष्टमीला खीरीसोबत या पाच गोष्टींचा नैवैद्य करा, राधारानी करेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) : प्रेमजीवनात नवीन संधी मिळू शकते. ही संधी नवीन व्यक्तीविषयी असलेले कुतूहल किंवा एखाद्या व्यक्तीशी असलेलं सखोल नातं याबाबत असेल. नवीन ऊर्जेसाठी तयार राहा. करिअरमध्ये परिवर्तन होऊ शकते. तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल आणि नवीन गोष्टी करण्याची उत्सुकता मनात असेल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मनातील विचारांनुसार कृती करा. आर्थिक लाभ होऊ शकतो. खर्चाबाबत सतर्क राहा. आर्थिक उद्दिष्टांवर स्थिर राहा. भावनेच्याभरात खरेदी टाळा. नियमित शारीरिक तपासणी करा. स्वतःची काळजी घ्या. मानसिक आणि भावनिक गरजांकडे लक्ष द्या.

LUCKY Sign – An Engine

LUCKY Color – Charcoal Gray

LUCKY Number - 12

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) : जीवनात आनंद आणू शकणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. सध्याच्या नातेसंबंधात संवाद आणि प्रामाणिकपणा व्यक्त कराल. कामाकडे बारकाईनं लक्ष द्या. घाईत निर्णय घेऊ नका. निर्णय घेण्यापूर्वी सर्व शक्यता पडताळा. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन आर्थिक संधी मिळतील. बजेटची काळजी घ्या. खर्चाबाबत सतर्क राहा. नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी प्रेरित आणि उत्साही असाल. आरोग्याची नियमित तपासणी करा. स्वतःची काळजी घ्या.

LUCKY Sign – A White Rose

LUCKY Color - Yellow

LUCKY Number - 11

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) : प्रेमजीवनात सकारात्मक आणि नकारात्मक अशी संमिश्र ऊर्जा असेल. नव्याने प्रेमात पडताना संभाव्य वादापासून सावध राहा. संवादावर भर द्या. स्वतःशी आणि जोडीदाराशी प्रामाणिक राहा. करिअरमध्ये संयम आणि चिकाटी ठेवावी लागेल. तुमच्या मार्गात अडथळे आले तरी ध्येयावर लक्ष केंद्रित करा. क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च करू नका. भविष्यासाठी आर्थिक नियोजन आणि बचत करण्याकडे लक्ष द्या. व्यायाम, विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी वेळ द्या. तणाव, चिंता कोणत्या गोष्टींमुळे वाढते, त्याकडे लक्ष देऊन त्यांचे निराकरण करा. प्रवासाचे नियोजन करू शकता.

LUCKY Sign – A Milestone

LUCKY Color - Beige

LUCKY Number - 10

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) : प्रेमजीवनात चढ-उतार जाणवतील. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण या गोष्टी सकारात्मक आणि आशादायी असतील. ऑफिसमध्ये अडचणी येतील. पण तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्नात सातत्य ठेवा. खर्चाच्या सवयींबाबत सतर्क राहा. भावनेच्याभरात खरेदी करणे टाळा. पैशांच्या बाबतीत शिस्त पाळा. प्रवासात रोमांचक अनुभव येतील. मनमोकळेपणानं प्रवासाचा आनंद घ्या. यामुळे तुमचा दृष्टीकोन स्थिर राहू शकेल.

LUCKY Sign – A Squirrel

LUCKY Color – Saffron Orange

LUCKY Number – 28

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) : प्रेम जीवनात उत्कटता आणि रोमँटिक मूड असेल. प्रेम जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. त्यामुळे जोडीदाराशी नातं घट्ट होईल. पण संभाव्य वाद आणि गैरसमजापासून सावध राहा. ऑफिसमध्ये विकासाची संधी मिळू शकते. पण इतरांच्या ईर्ष्या आणि स्पर्धेपासून सतर्क राहा. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. त्यामुळे विकास आणि नवीन उपक्रमांची संधी मिळेल. जास्त प्रमाणात खर्च करताना आर्थिक उद्दिष्टाकडे लक्ष असू द्या. शारीरिक आणि भावनिक क्षमता वाढेल. आव्हानांचा सामना करून त्यावर मात करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल. स्वतःची काळजी घ्या. शारीरिक आणि भावनिक गरजांमध्ये संतुलन ठेवा. प्रवास सकारात्मक असेल. प्रवासात आलेले नवीन अनुभव वैयक्तिक विकासाला पूरक ठरतील.

LUCKY Sign – An Aquarium

LUCKY Color – Baby Pink

LUCKY Number -16

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) : प्रेमजीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. नवीन नातेसंबंधाला सुरुवात होऊ शकते. संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी योग्य काळजी घ्या. करिअरमध्ये हा कालावधी यशस्वी आणि समृद्ध असेल. तुम्हाला नवीन ओळख तसेच अनपेक्षित संधी मिळू शकते. यामुळे आत्मसंतुष्ट किंवा गर्विष्ठ होऊ नका. कारण याचे दीर्घकाळ नकारात्मक परिणाम जाणवू शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सकारात्मक होईल. भावनेच्याभरात खर्च टाळा आणि नकारात्मक परिणाम होतील असे निर्णय घेऊ नका. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य सुधारेल. प्रवासासाठी नवीन ठिकाणं शोधा. अशा ठिकाणी केलेला प्रवास जीवन बदलून टाकणारे अनुभव देईल. सुरक्षितता आणि आरोग्यासाठी योग्य खबरदारी घ्या.

LUCKY Sign – A Copper Vessel

LUCKY Color - Blue

LUCKY Number – 8

Radha Ashtami 2024: राधाअष्टमी व्रत केल्याने होतील चमत्कारिक फायदे! श्रीकृष्णही होतात प्रसन्न

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) : नातेसंबंध घट्ट होतील. नात्यात वचनबद्धता आणि चांगले समन्वय असेल. नात्यात एखाद्या गोष्टीची निवड करणं कठीण होऊ शकतं. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. हा बदल नवीन संधी आणि विकासाला पूरक असेल. आरोग्य चांगले राहण्यासाठी जीवनातील विविध गोष्टींमध्ये संतुलन राहण्याकरिता नवीन मार्ग शोधावे लागतील. अचानक केलेला प्रवास वैयक्तिक विकास आणि नवीन शोधासाठी पूरक ठरू शकतो. प्रवासाच्या मार्गात विलंब लागू शकतो.

LUCKY Sign – A Lamp Shade

LUCKY Color - Silver

LUCKY Number – 4

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) : प्रेम जीवनात आणि नातेसंबंधात सकारात्मक ऊर्जा असेल. पण काही गैरसमज किंवा वाद देखील असू शकतात. यासाठी नात्यात प्रामाणिक संवाद आवश्यक आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. पण त्यातील संभाव्य अडचणी आणि संघर्ष लक्षात घ्यावा. या गोष्टी टाळण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरी गरजेची आहे. नियमित व्यायाम, सकस आहारामुळे आरोग्यात सकारात्मक बदल होतील. प्रवासात सकारात्मक आणि साहसी अनुभव येतील. त्यासाठी लवचिक राहा आणि आश्चर्यकारक गोष्टींचा अनुभव घ्या. वर्तमानात राहून प्रवासाचा आनंद घ्या.

LUCKY Sign – A Jewellery Box

LUCKY Color - Gold

LUCKY Number - 7

मराठी बातम्या/अध्यात्म/
astrology: या 5 राशींचे नशीब जोरावर! प्रेमप्रकरणात मिळेल यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल