TRENDING:

31 वर्षे अनवाणी फिरले, आता होतेय संकल्पपूर्ती, कोल्हापूरच्या कारसेवकाची कहाणी, Video

Last Updated:

कोल्हापूरच्या एका कारसेवकाचा संकल्प अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी पूर्ण होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : प्रभू श्रीरामांचे आयोध्येत मंदिर व्हावे यासाठी कित्येक जणांनी प्रयत्न केले. अनेक कारसेवकांसह रामभक्तांनी मंदिर पूर्ततेसाठी प्रार्थना, पूजाअर्चा याबरोबरच विविध संकल्पही केले. त्या सगळ्यांचे संकल्प आता पूर्णत्वास येत आहेत. अशातच कोल्हापूरच्या एका कारसेवकाचा संकल्प देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पूर्ण होईल. गेली 31 वर्षे कोल्हापूरचे हे कारसेवक अनवाणी जीवन जगण्याचा संकल्प करुन रामभक्ती करत आहेत. मात्र त्यांनी केलेला पण आता पूर्ण होत आहे. तर गावकऱ्यांकडूनही त्यांना नवीन पादत्राणे प्रदान करुन सत्कार करण्यात येत आहे.

advertisement

1992 साली कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिये गावातून जवळपास 35 जण आयोध्येला गेले होते. बाबरी मशिदीचा विवादित ढाचा पाडतेवेळी हे सर्वजण तिथे उपस्थित होते. तिथून परतत असताना यांपैकी एक असलेल्या निवास पाटील यांनी एक निश्चय केला होता. अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर व्हावे, यासाठी निवास पाटील यांनी अनवाणी जीवन जगण्याचा संकल्प केला होता. निवास पाटील हे एक रिक्षाचालक आहेत. पण त्यांनी केलेल्या संकल्पामुळेच गेली 31 वर्ष ते कुठेही जाताना, प्रवास करताना पायात चपला घालत नाहीत. मात्र आता आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे मंदिराबाबत स्वप्नपूर्तीचा आनंद गगनात मावेनासा आहे, असे मत निवास पाटील यांनी व्यक्त केले आहे.

advertisement

रामभक्तीत रंगले अभिनेते सचिन पिळगावकर, कसा आहे पहिल्याच भक्तीगीताचा अनुभव?, Video

22 जानेवारीला विशेष सत्कार

22 जानेवारी 2024 रोजी लाखो करोडो राम भक्तांचे स्वप्न साकार होत आहे. त्यातच कोल्हापूरच्या निवास पाटील यांचीही संकल्पपूर्ती होत आहे. त्यामुळेच या शुभदिनी निवास पाटील यांचा त्यांच्या या मोठ्या त्यागाबद्दल शिये गावच्या ग्रामस्थांकडून एक सत्कार सोहळाही करण्यात येणार आहे. यावेळी निवास यांच्या पायात चप्पल घालण्यासाठी नवीन पादत्राणे त्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

advertisement

निवास पाटील यांना आजतगायत गेली 31 वर्षे ऊन, वारा, पाऊस अशा विविध वातावरणात अनवाणी राहूनच आपली रोजची कामे करावी लागत असत. तर शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून मोहिमा करत अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी जनजागृतीही करत आले आहेत. मात्र आता 22 जानेवारीला आयोध्येत होणाऱ्या सोहळ्यामुळे इतक्या वर्षांचा आपला संकल्प पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद ते साजरा करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
31 वर्षे अनवाणी फिरले, आता होतेय संकल्पपूर्ती, कोल्हापूरच्या कारसेवकाची कहाणी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल