वर्धा : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांची भक्ती व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम भक्तांकडून राबविले जाताहेत. असेच एक रामभक्त कुटूंब वर्ध्यातील आर्वीमध्ये अनोख्या पद्धतीने रामभक्ती व्यक्त करत आहे. स्वर्गीय ह.भ.प. राम राम महाराज उर्फ हरिकीसनजी चांडक आणि त्यांच्या धर्मपत्नी शारदा देवी यांनी आर्वीमध्ये 2004 मध्ये रामनाम बँक स्थापन करून हजारो लोकांना राम नाम पुस्तिकांचे वाटप केले आणि त्यांच्याकडून 200 कोटी रामनाम लिहून घेतले. केवळ लिहूनच घेतले नाही तर ते सर्व आपल्या संग्रही ठेवले आहेत. आजही त्यांच्याकडे 180 कोटी रामनामाचा खजिना आहे.
advertisement
2004 पासून करताहेत कथा
स्वर्गीय ह. भ. प. राम राम हरिकीसनजी महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी शारदा देवी यांनी 2004 पासून श्रीमद् भागवत कथा, राम कथा आणि सुंदर कांड निःशुल्क करायला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आणि बहुसंख्य कारागृहामध्ये राम कथा केली आहे. आजही शारदा देवी राम कथा श्रीमद् भागवत कथा आणि सुंदर कांड निःशुल्क करतात.
रामलल्लांची वस्त्र पोहोचली अयोध्याला; महाराष्ट्रातील कन्येला शिवण्याचा मान Video
संतांच्या भूमीत राम नाम बँक
आर्वी ही संतांची भूमी आहे संत मायबाई, संत पांडुरंग महाराज, संत सरू माता यांच्या कृपाशीर्वादाने पुनित झालेल्या या भूमीत रामनामाची बँक उघडून स्वर्गीय राम राम महाराजांनी आर्वीच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. स्वर्गीय राम राम महाराजांचे कुटुंब समाजसेवेत सतत अग्रेसर असतात. त्यांची सेवा कोरोना काळात आर्वीकरांनी अनुभवलेली आहे. आजही त्यांच्या दारातून गरजू व्यक्ती रित्या हाताने परत जात नाही. त्यांची दोन्ही मुले गोपाल आणि मोहन वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करत असतात.