वर्धा : विदर्भातील बहिणाबाई अशी वर्धा येथील ज्येष्ठ कवयित्री शोभाताई कदम यांची ओळख आहे. 85 वर्षांच्या वयातही त्यांना कविता सुचतात. सध्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा देशभर उत्साह आहे. यावरच शोभाताईंनी कविता तयार केलीय. 'पुनःआगमन श्रीरामाचे' असे कवितेचे बोल असून ते अनेकांना भूरळ घालत आहेत.
-पुनः आगमन श्रीरामाचे-
अयोद्धा नगरी महान,
advertisement
इथे रामाचे मंदिर बांधले छान,
पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचे काम
अयोध्येत प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली,
मूर्ति राम- लक्ष्मण- सीतेची बसविली,
पूजा सर्व भाविक भक्तांनी केली,
पूजा सर्व जनतेने केली,
घडलं चार धाम, साक्षात उभे राम भगवान,
पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम
अयोध्या नगरी तीर्थाचे स्थान थोर,
होतो इथे राम नामाचा गजर,
दुमदुमले आयोध्या शहर,
पाहिले तुमचे चरण, गेली उद्धारुन
इथे लाभली मला भावभक्तीची खाण,
पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम
सरळ हाताने करा धर्मदान,
पुण्य मिळते दानधर्मातून,
भेट देईल लक्ष्मी-नारायण,
राधे कृष्ण तू श्याम
तुला कोटी कोटी प्रणाम,
पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम
Ram Mandir : रामलल्लांची वस्त्र पोहोचली अयोध्याला; महाराष्ट्रातील कन्येला शिवण्याचा मान Video
श्रीराम प्रभू तुमची मंदिरात उभी आहे मूर्ती,
तुम्हीच दिली मला काव्य लिहिण्याची स्फूर्ती,
इथे झाले माझे समाधान,
अयोध्येचा राम राजा,
करते मी तुझी पूजा
शोभा तुझ्या नामस्मरणाचे करते ध्यान,
पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम
दरम्यान, आजही शोभाताई कदम यांच्या वेगवेगळ्या विषयांवरील वेगवेगळ्या प्रसंगातील कविता प्रसिद्ध आहेत. आयोध्येत प्रभू श्रीरामाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असून या शुभप्रसंगी त्यांनी ही कविता लिहिली आहे.