मुख्य प्रवेशद्वारावर करा 'हा' बदल
घराचे मुख्य प्रवेशद्वार हे सकारात्मक ऊर्जेचे उगमस्थान मानले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या पानांचे 'तोरण' अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. तसेच, दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने 'स्वस्तिक' काढावे. स्वस्तिक हे गणपतीचे आणि शुभतेचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरात सुख-शांती नांदते आणि देवी लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो.
advertisement
अखंड दिव्याचे महत्त्व आणि दिशा
नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला नऊ दिवस दिवा लावणे शक्य नसेल, तर पहिल्या दिवशी पूजेच्या वेळी शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा. हा दिवा देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावा, कारण ही दिशा अग्नी तत्त्वाची आहे. दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. असे मानले जाते की, यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात सुधारणा होते आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. दिव्यामध्ये एक लवंग टाकल्यास घरातील 'नजर दोष' देखील दूर होतो.
लाल रंगाच्या वस्त्राचा आणि श्रृंगाराचा उपाय
देवी दुर्गा ही शक्तीचे रूप आहे आणि तिला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना करताना देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करावी. यासोबतच मातेला पाच प्रकारची फळे आणि श्रृंगाराचे साहित्य अर्पण करावे. हा उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते. तसेच, पहिल्या दिवशी देवीला लाल कमळाचे किंवा जास्वंदाचे फूल अर्पण करून 'दुर्गा सप्तशती'चे पठण केल्यास शत्रूवर विजय मिळतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
