पाच दिवसात शिकला ब्राह्मी
“ ब्राह्मी लिपी शिकायला पाच दिवस लागले तर मोडी लिपी शिकण्यासाठी दहा दिवसात लागले. लिपीचा अभ्यास केल्यानंतर काहीतरी लिहावे असे वाटू लागले. तेव्हा आठवले की धर्मशास्त्रात भगवद्गीता या ग्रंथाला खूप मोठा मान आहे. त्यामुळे भगवद्गीता मोडी लिपीत 60 पानांची तर ब्राह्मी लिपीत जवळपास 65 पानांची लिहिली. तसेच दोन्ही लिपींचा अभ्यास वडील विठ्ठल गोरे यांना असल्यामुळे त्यांच्याकडून या लिपिंचा अभ्यास आणि शिक्षण घेतले,” असे श्रीकांतने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
वडीलच श्रीकांतचे गुरू
इतिहास जाणून घेणे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही विविध पत्रांसाठी मोडी लिपीचा वापर केला जायचा. लिपींचा अभ्यास केल्यावरच इतिहास समजतो. त्यामुळे मोडी आणि ब्राह्मी लिपीचा अभ्यास केला. इतिहास जाणून घेण्याची आवड असल्यामुळे या लिपींचे ज्ञान अवगत झाले आणि माझ्या मुलाला देखील मोडी आणि ब्राह्मी लिपी शिकवली, असे विठ्ठल गोरे यांनी सांगितले.
तरुणांपुढे अनोखा आदर्श
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, अनेकजण आपल्या ऐतिहासिक वारशापासून दूर जात आहेत, त्यातच श्रीकांतने आपल्या प्राचीन लिपी आणि संस्कृतीशी नाते जोडून एक वेगळाच मार्ग निवडला आहे. त्याच्या या प्रयत्नाने केवळ प्राचीन लिपींचे महत्त्व अधोरेखित होत नाही, तर तरुणांना आपले ज्ञान आणि कौशल्ये सकारात्मक कामांसाठी वापरण्याची प्रेरणा देखील मिळते. त्याची ही अनोखी कामगिरी निश्चितच त्याला भविष्यात अशाच प्रकारच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रकल्पांसाठी प्रोत्साहित करेल.