Karate Champion: आईनं मंगळसूत्र विकून दिले पैसे, 12 वर्षाच्या लेकानं जग जिंकलं, चीनला नमवत गोल्ड मेडल!

Last Updated:

Karate Champion: घरची गरिबी असतानाही पुण्यातील एका आईने लेकासाठी मंगळसूत्र विकून पैसे जमवले. आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत 12 वर्षीय चिमुकल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले

+
Karate

Karate Champion: आईनं मंगळसूत्र विकून दिले पैसे, 12 वर्षाच्या लेकानं जग जिंकलं, चीनला नमवत गोल्ड मेडल!

पुणे: जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर संकटांवर मात करत मोठं यश संपादित करता येतं. पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्यानं हेच सिद्ध करून दाखवलंय. घरची गरिबी असताना आईनं मंगळसूत्र विकून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठवलं.  तर यश हनुमंत खंडाले यानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करत जग जिंकलं. मलेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत यशनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
पुण्यातील दुर्गा माता वसाहतीमध्ये 12 वर्षीय यश खंडाले आई-वडिलांसह राहतो. यशचे वडील घरोघरी जाऊन फुलविक्री करतात. तर आईही मिळेल ते काम करते. मलेशियातील कराटे स्पर्धेसाठी मुलाची निवड झाली होती. परंतु, पैसे नसल्याने आईने मंगळसूत्र विकून पैसे जमा केले. तर मुलानंही चीनच्या प्रतिस्पर्ध्याला मात देत सुवर्णपदक पटकावले.
advertisement
यशचे वडील हनुमंत खंडाले गेली 35 ते 40 वर्षे घरोघरी जाऊन फुलविक्रीचा व्यवसाय करत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी कधीच कशाची उणीव भासू दिली नाही. यश गेल्या सहा वर्षांपासून कराटेचा नियमित सराव करत असून त्याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र यंदा त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
advertisement
अजून यश मिळवायचं आहे
मलेशियात होणाऱ्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत लागणार होती. त्यावेळी आईने क्षणाचाही विचार न करता आपलं मंगळसूत्र विकून मला पाठवलं. आईबाबा दोघंही माझ्या या यशामुळे खूप आनंदी आहेत. ही सुरुवात आहे, पुढे अजून मोठं यश मिळवायचं आहे, अशा भावना यशने व्यक्त केल्या.
32 देशांतील खेळाडूंतून बाजी
या स्पर्धेत 32 देशांमधून खेळाडू सहभागी झाले होते. यशने उत्तम तयारी, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सुवर्णपदक मिळवलं. यशच्या प्रशिक्षकांनी देखील त्याच्या मेहनतीचं आणि कौशल्याचं कौतुक केलं आहे. आपल्या मुलाने  काही तरी मोठं कराव अशी इच्छा होती. म्हणून त्याला मागे वळून पाहू दिलं नाही. अशी माहिती यशाचे वडील हनुमंत खंडाले यांनी दिली आहे.
advertisement
यशचे हे यश म्हणजे जिद्द, त्याग आणि सातत्य यांचं उदाहरणं आहे. अशा कष्टकरी कुटुंबातून आलेल्या मुलाने जागतिक पातळीवर मिळवलेली हे यश इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. यशला आता आशियाई आणि ऑलिंपिक स्तरावर प्रतिनिधित्व करायच आहे, आणि त्यासाठीही त्याच्या पालकांनी नव्याने प्रवास सुरू केला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Karate Champion: आईनं मंगळसूत्र विकून दिले पैसे, 12 वर्षाच्या लेकानं जग जिंकलं, चीनला नमवत गोल्ड मेडल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement