कावळा डोक्यावर येऊन बसणे
जर एखादा कावळा अचानक उडत येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसला, तर सामुद्रिक शास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, त्या व्यक्तीवर भविष्यात मोठे संकट येऊ शकते किंवा त्याला गंभीर आजार जडू शकतो. काही ठिकाणी याला मृत्यूतुल्य कष्ट किंवा मान-सन्मानात घट होण्याचे लक्षण मानले जाते. अशा वेळी अनेक जण घरात शांती किंवा दानधर्म करण्याचा सल्ला देतात.
advertisement
घराच्या छतावर बसून 'काव-काव' करणे
जर कावळा तुमच्या घराच्या छतावर किंवा गॅलरीत बसून नेहमीच्या सुरात ओरडत असेल, तर हे शुभ लक्षण आहे. जुन्या काळच्या समजुतीनुसार, हे घरी 'पाहुणे' येणार असल्याचे संकेत आहेत. तसेच यामुळे तुमच्या घरात आनंदाची बातमी किंवा प्रलंबित कामे पूर्ण होण्याचे संकेतही मिळतात.
कावळा पोळीचा तुकडा घेऊन उडताना दिसणे
जर तुम्हाला एखादा कावळा त्याच्या चोचीत पोळीचा तुकडा, मांस किंवा अन्नाचा मोठा घास घेऊन उडताना दिसला, तर हे अत्यंत शुभ आहे. याचा अर्थ असा होतो की, तुमची एखादी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा तुम्हाला कुठूनतरी धनलाभ होणार आहे.
अनेक कावळे एकत्र ओरडणे
जर तुमच्या घराभोवती किंवा गच्चीवर अनेक कावळे एकत्र जमून कर्कश आवाजात ओरडत असतील, तर हे अशुभ मानले जाते. हा घरावरील किंवा त्या भागावरील एखाद्या सामूहिक संकटाचा इशारा असू शकतो. अशा वेळी कुटुंबातील सदस्यांनी सावधगिरी बाळगणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.
दक्षिणेकडे तोंड करून ओरडणारा कावळा
दिशांचा विचार केल्यास, दक्षिण दिशा ही यमराजाची मानली जाते. जर कावळा दक्षिणेकडे तोंड करून ओरडत असेल, तर तो कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी संकटाचा इशारा मानला जातो. मात्र, काही शास्त्रानुसार यामुळे पितरांचे स्मरण होते आणि ते तृप्त झाल्याचेही लक्षण असू शकते. कावळ्याला आपल्याकडे शकुन-अपशकुनाचा आरसा मानले जाते. वरील सर्व माहिती ही लोकमान्यता आणि सामुद्रिक शास्त्रावर आधारित आहे. अशा संकेतांमुळे घाबरून न जाता, आपली कामे प्रामाणिकपणे करणे आणि सावधानता बाळगणे नेहमीच हितकारक ठरते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
