असे मानले जाते की, देवशयनी एकादशीनंतर दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. या काळात भगवान शिव जगाची काळजी घेतात. म्हणूनच या तारखेच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो. या काळात पुढील चार महिन्यांसाठी विवाहसारखी शुभ कार्ये वर्ज्य असतात. ध्यान, उपवास आणि संयमाला विशेष महत्त्व दिले जाते. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्या मते, या वेळीची देवशयनी एकादशी अधिक खास असणार आहे. कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत.
advertisement
कधी साजरी होणार देवशयनी एकादशी?
वैदिक पंचांगानुसार, आषाढ शुक्ल एकादशी तिथी 5 जुलै रोजी सायंकाळी 6:58 वाजता सुरू होईल आणि 6 जुलै रोजी रात्री 9:14 वाजेपर्यंत चालेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, उपवास करण्यासाठी 6 जुलै हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष पुण्य लाभते. तसेच, जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो.
हा उपाय नक्की करून पाहा
- जर खूप प्रयत्न करूनही तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालले नसेल, तर देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला 16 प्रकारचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य अर्पण करा. हे खूप फायदेशीर आहे. यामुळे वैवाहिक जीवनात सुख येते. तुम्हाला अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात.
- घरात सतत भांडणे होत असतील, शांतता टिकत नसेल, तर देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कलावा (लाल दोरा) अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते.
- खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडचणी येत असतील, तर देवशयनी एकादशीला तुळशीजवळ 11, 21 किंवा 51 दिवे लावा आणि तुळशी चालिसाचे पठण करा. असे केल्याने अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे.
हे ही वाचा : Guru Purnima 2025: यंदा गुरुंना द्या त्यांच्या राशीची 'ही' खास भेट, होईल विशेष कृपा अन् व्हाल समृद्ध!
हे ही वाचा : घरात ‘या’ पक्ष्यांची घरटी असणं आहे शुभ की अशुभ? शकुन शास्त्र काय सांगतं?