ही स्वप्ने खूप शुभ मानली जातात
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात कुलदेवी दिसणे हे खोल संकेत देते, पण जर कुलदेवी हसताना दिसल्या, तर ते कुटुंबासाठी खूप शुभ संकेत आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नात कुलदेवीचे दर्शन झाले, तर याचा अर्थ त्या व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत, असा होतो.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात वारंवार कुलदेवीचे दर्शन होणे, हे कुटुंबातील सदस्यांसाठी चांगले दिवस सुरू होणार असल्याचा संकेत आहे. थांबलेली कामं मार्गी लागणार असल्याचं ते दर्शवतं.
advertisement
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात कुलदेवीचे दर्शन झाले, तर याचा अर्थ कुटुंबावरील मोठे संकट टळले आहे, असा होतो. एखाद्या मोठ्या समस्येवर लवकरच तोडगा सापडणार असल्याचाही हा संकेत आहे.
स्वप्नात कुलदेवी रागावलेल्या दिसल्यास काय करावे?
स्वप्नात कुलदेवी प्रसन्न दिसल्यास खूप शुभ असतं, पण जर त्या रागावलेल्या दिसल्या, तर दिवा लावून कुलदेवीला प्रसन्न करता येते. रात्री झोपण्यापूर्वी कुलदेवीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि डोळे मिटून ध्यान करावे. नकळत झालेल्या चुकांसाठी, पापांसाठी कुलदेवीकडे माफी मागावी. त्यानंतर कुटुंबाच्या रक्षणासाठी त्यांची प्रार्थना करावी, यामुळे आशीर्वाद मिळतो.
हे ही वाचा : कुंडलीत मंगळ दोष त्रास देतोय? तर 'या' 5 दिवसात करा हनुमानजींची पूजा; प्रत्येक संकटातून होईल सुटका
हे ही वाचा : इथे प्रत्येक मुलाला व्हावं लागतं सन्यासी; 'या' परंपरेमागे दडलंय मोठं रहस्य; अनोख्या संस्काराची देशभर चर्चा