इथे प्रत्येक मुलाला व्हावं लागतं सन्यासी; 'या' परंपरेमागे दडलंय मोठं रहस्य; अनोख्या संस्काराची देशभर चर्चा
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उत्तराखंडमधील बागेश्वरसारख्या पर्वतीय भागांत ‘जनेऊ’ म्हणजेच ‘उपनयन संस्कार’ शतके जुनी परंपरा आजही जपली जाते. या संस्कारात मुलाला एक दिवसासाठी संन्यासी बनवलं जातं. त्यामागे...
उत्तराखंडच्या डोंगराळ भागात आजही शतकानुशतके जुन्या परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळल्या जातात. बागेश्वरसारख्या ठिकाणी पारंपरिक रितीरिवाज खूप गांभीर्याने केले जातात. यापैकीच एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे 'जेनेऊ संस्कार', ज्याला 'उपनयन संस्कार' असंही म्हणतात. धार्मिक दृष्ट्याच नाही, तर सामाजिक आणि नैतिक दृष्ट्याही या संस्काराला खूप महत्त्व आहे. पण या संस्काराशी संबंधित एक अनोखी परंपरा या डोंगराळ भागात आहे. इथे जेनेऊ संस्काराच्या वेळी प्रत्येक मुलाला एकदा संन्यासी बनवलं जातं.
एवढं महत्त्व का?
बागेश्वरचे पंडित कैलाश उपाध्याय लोकल 18 शी बोलताना सांगतात की, ही परंपरा केवळ प्रतीकात्मक नाही, तर त्यामागे एक खोल धार्मिक श्रद्धा आणि जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. असं मानलं जातं की, जेव्हा मुलगा संन्याशाचं रूप धारण करतो, तेव्हा तो जगाच्या बंधनातून वर उठून शुद्धता आणि अध्यात्माकडे वाटचाल करतो. काही काळासाठी घेतलेला संन्यास हे दाखवून देतो की, जीवन केवळ भौतिक सुखांपुरते मर्यादित नाही, तर त्याला आध्यात्मिक जबाबदाऱ्याही आहेत. स्थानिक ज्येष्ठांच्या मते, या प्रक्रियेमुळे मुलामध्ये मानसिक परिपक्वता येते आणि तो जबाबदार बनतो.
advertisement
दुसरा जन्म!
पवित्र जानवं (जाणवे) धारण करणं हे स्वतःच एक मोठं धार्मिक पाऊल आहे. हे मुलाच्या 'दुसऱ्या जन्माचं' प्रतीक मानलं जातं, ज्यात तो आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांसह जीवनाकडे वाटचाल करतो. हा संस्कार झाल्यानंतर मुलाला वेद पठण, पूजा-अर्चा आणि धार्मिक नियमांचं पालन करायला शिकवलं जातं. जानवं धारण करणाऱ्या मुलाला काही खास नियम पाळावे लागतात, जसं की शुद्धता राखणे, रोज स्नान करणे, धार्मिक आचरण करणे इत्यादी.
advertisement
मुलाला एक दिवसासाठी संन्यासी बनवणं म्हणजे त्याला जीवनातील मूल्यांशी जोडणं आणि त्याच्यात शिस्त व आत्मनियंत्रण आणण्याचा एक मार्ग मानला जातो. हा विधी मुलांना आयुष्यभर धार्मिक आणि नैतिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. ही अनोखी परंपरा येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचं काम करते.
हे ही वाचा : इथे बापच करतो मुलीशी लग्न, आई बनते सवत! 'या' जमातीत आजही जिवंत आहे विचित्र प्रथा, वाचा सविस्तर...
advertisement
हे ही वाचा : मुलं चॅलेंज घेतात, नंतर लॅपटाॅप पेटवून देतात, शाळेत निघतोय जाळ अन् धूर, त्यामागचं कारणं ऐकून व्हाल चकित
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 5:38 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
इथे प्रत्येक मुलाला व्हावं लागतं सन्यासी; 'या' परंपरेमागे दडलंय मोठं रहस्य; अनोख्या संस्काराची देशभर चर्चा