मुलं चॅलेंज घेतात, नंतर लॅपटाॅप पेटवून देतात, शाळेत निघतोय जाळ अन् धूर, त्यामागचं कारणं ऐकून व्हाल चकित

Last Updated:

TikTokवर ‘Chromebook Challenge’ आणि ‘F Student’ नावाने एक घातक ट्रेंड व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या क्रोमबुक लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टमध्ये फॉइल, पेन्सिल...

TikTok challenge
TikTok challenge
आजकाल सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड येत असतात. पण सध्या जगभरात एक नवीन आणि धोकादायक ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये मुलं एका नव्या प्रकारचं चॅलेंज स्वीकारत आहेत. TikTok वर व्हायरल होण्यासाठी त्यांनी आता लॅपटॉपलाच निशाणा बनवलं आहे. अमेरिकेतील अनेक शाळांमध्ये मुलं आपल्या Chromebook लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टमध्ये काहीतरी विचित्र वस्तू टाकत आहेत. ज्यामुळे त्यांचे लॅपटॉप पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे शाळा आणि मुलांचे पालक दोघेही चिंतेत आहेत.
काय आहे हे चॅलेंज?
हे चॅलेंज प्रसिद्ध चीनी सोशल मीडिया साईट TikTok वर सध्या खूप चर्चेत आहे. याला #ChromebookChallange असं म्हटलं जातं. या चॅलेंजमध्ये मुलं एक धोकादायक स्टंट करतात. यासाठी त्यांना आपल्या लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टमध्ये कागदाचे कपटे, पेन्सिलची लीड किंवा फॉईल पेपर सारख्या वस्तू टाकायच्या असतात. यामुळे लॅपटॉपमध्ये, खासकरून त्याच्या चार्जरमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ शकतो.
advertisement
यामुळे काय होतं?
असं केल्याने लॅपटॉप किंवा चार्जरला आग लागण्याची किंवा विषारी धूर बाहेर पडण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे शाळेत आग पसरण्याची भीती निर्माण होते आणि वर्ग रिकामे करावे लागतात. सगळीकडे विषारी धूर पसरतो. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कनेक्टिकट येथील न्यूिंग्टन हायस्कूलमध्ये अशीच एक घटना घडली, ज्यामुळे एका खोलीत पूर्णपणे धूर भरला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, शहराचे फायर मार्शल डीजे जॉर्डन यांनी सांगितलं की, हा आता केवळ ट्रेंड राहिला नाही. लॅपटॉपच्या बॅटरी खूप लवकर पेट घेतात. एकदा त्या पेटल्या की विषारी वायू बाहेर टाकू लागतात आणि अशावेळी अग्निशमन दलाला बोलावावं लागतं.
advertisement
व्हायरल होण्यासाठी पेटवला जातोय लॅपटाॅप
अमेरिकेतील कॅलिफोर्निया, कॅरोलिना, पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, र्होड आयलंड, विस्कॉन्सिन आणि वॉशिंग्टनमध्येही अशा घटना घडल्याचं दिसून आलं आहे. TikTok वर हे चॅलेंज #ChromebookDurabilityTest आणि #FStudent या नावांनी व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांत त्यांचे व्हिडिओ TikTok वर हजारो व्ह्यूज मिळवतात. या क्लिप्स आणि व्हिडिओंमध्ये मुलं स्प्रिंगपासून पिनपर्यंत आणि अगदी ॲल्युमिनियम फॉईलसुद्धा लॅपटॉपमध्ये टाकताना दिसत आहेत, त्यानंतर लॅपटॉपमधून धूर निघायला सुरुवात होते. आणि हे सगळं केवळ व्हायरल होण्यासाठी केलं जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
मुलं चॅलेंज घेतात, नंतर लॅपटाॅप पेटवून देतात, शाळेत निघतोय जाळ अन् धूर, त्यामागचं कारणं ऐकून व्हाल चकित
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement